नवी दिल्ली : भारतीय औद्योगिक इतिहासातील सर्वांत वाईट तिमाही नुकसान सोसल्यानंतर व्होडाफोन-आयडियाने सरकारकडे मदतीची याचना केली आहे. कंपनीला कोसळण्यापासून वाचविण्यासाठी मदत मिळणे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.मागील कराच्या थकबाकीपोटी भारत सरकारने कंपनीला ४ अब्ज डॉलरचा भरणा करण्यास सांगितलेले आहे. त्यातच सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीला तब्बल ५०९ अब्ज रुपयांचा (७.१ अब्ज डॉलर) अभूतपूर्व तोटा झाला आहे. २०१७ पासून कंपनीला नफाच झालेला नाही. व्होडाफोन-आयडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी चालू राहणे हे आता केवळ सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे. आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनी सरकारसोबत सक्रिय चर्चाही करीत आहे. कंपनीवर १४ अब्ज डॉलरचे कर्ज आहे. जिओच्या आगमनानंतर या कंपनीला मोठा फटका बसला.
व्होडाफोन-आयडियाला हवीय सरकारची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:09 AM