Lokmat Money > बिझनेस न्यूज > Income Tax Return बाबत करदाते कायम करतात 'या' १० चुका, पाहा काय टाळलं पाहिजे

Income Tax Return बाबत करदाते कायम करतात 'या' १० चुका, पाहा काय टाळलं पाहिजे

Income Tax Return: आयकर रिटर्नबाबत करदाते अनेकदा चुका करतात आणि त्यानंतर आयकर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 02:21 PM2023-06-29T14:21:23+5:302023-06-29T14:22:23+5:30

Income Tax Return: आयकर रिटर्नबाबत करदाते अनेकदा चुका करतात आणि त्यानंतर आयकर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवली जाते.

Here are 10 mistakes taxpayers make during Income Tax Return filing see what should be avoided last date 31st july 2023 | Income Tax Return बाबत करदाते कायम करतात 'या' १० चुका, पाहा काय टाळलं पाहिजे

Income Tax Return बाबत करदाते कायम करतात 'या' १० चुका, पाहा काय टाळलं पाहिजे

Income Tax Return: आयकर विभागाकडून रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चिक करण्यात आली आहे. आयकर विभागानं यासंदर्भात एक ट्वीटही केलं. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ कोटीचा पल्ला १२ दिवस आधीच गाठल्याचं त्यांनी सांगितलंय. करदात्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलं पाहिजे, असंही विभागानं ट्वीटद्वारे म्हटलंय.

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना बहुतेक लोक काही सामान्य चुका करतात. येथे अशाच आपण १० चुका पाहणार आहोत, ज्याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून आयकर रिटर्न भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

या चुका अवश्य टाळा

वेळेत आयटीआर न भरणं
दिलेल्या वेळेत रिटर्न न भरणं ही मोठी समस्या आहे. आयटीआर भरण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. यापूर्वी जर तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड ५ हजार रुपयांपर्यंत असू शकतो.

आयटीआर न भरणं
तुमचा आयटीआर भरला नाही तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. आयटीआर न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

चुकीचा आयटीआर फॉर्म
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अनेकदा असं दिसून येतं की लोक चुकीचा फॉर्म निवडतात, त्यामुळे आयटीआर भरला जात नाही.

बँक खात्याचं व्हेरिफिकेशन
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्ही तुमच्या बँक खात्याचं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. अन्यथा रिटर्नचे पैसे अडकू शकतात. यासोबतच इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

आयटीआर व्हेरिफाय करणं विसरणं
विभागाकडून नोटीस पाठवल्यावर बहुतेक लोकांना ही चूक कळते. म्हणूनच तुम्ही तुमची ITR पडताळणी करून घेतली पाहिजे. अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकतं. सध्या, आयटीआर व्हेरिफाय करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी मिळतो.

चुकीची वैयक्तिक माहिती
अनेकदा लोक त्यांच्या रिटर्नमध्ये वैयक्तिक माहिती देताना चुका करतात. या कारणास्तव, जेव्हा तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती द्याल तेव्हा ती सर्व कागदपत्रांमध्ये जुळवा आणि नंतर ती योग्यरित्या भरा.

चुकीचं असेसमेंट इयर निवडणं
असेसमेंट इयर हे आर्थिक वर्षानंतरचं वर्ष असतं. या प्रकरणात, जेव्हा रिटर्न भरलं जातं, तेव्हा आर्थिक वर्षानंतरचं असेसमेंट इयर निवडलं पाहिजे. उदाहरण सध्याच्या फायलिंगच्या वेळी तुम्ही असेसमेंट इयर २०२३-२४ निवडलं पाहिजे.

सर्व सोर्स ऑफ इन्कम न सांगणं
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड करणं अत्यंत आवश्यक आहे. जरी तुम्ही पगारदार व्यक्ती असाल, तरीही तुम्हाला विविध स्त्रोतांकडून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं.

नोकरी बदलल्याची माहिती
दुसरीकडे, जर तुम्ही आर्थिक वर्षात नोकऱ्या बदलल्या असतील, तर ही माहिती तुम्हाला तुमच्या आयटीआरमध्ये तुमच्या सध्याच्या आणि पूर्वीच्या दोन्ही कंपन्यांकडून मिळालेलं उत्पन्न जाहीर करावं लागेल.

भांडवली नफा, तोटा उघड करण्यात निष्काळजीपणा
आयटीआर सबमिट करताना अनेक जण भांडवली नफा आणि तोट्याचा तपशील वगळतात. या चुकीचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Web Title: Here are 10 mistakes taxpayers make during Income Tax Return filing see what should be avoided last date 31st july 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.