Join us  

मुलांना श्रीमंत करण्यासाठी या आहेत अत्यंत सोप्या ५ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 7:03 AM

Make Kids Rich: पैशांचे योग्य नियोजन हे सर्वात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. पालक या नात्याने, प्रत्येक जण आपल्या मुलांसाठी नेहमीच सर्वात उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना हवे असलेले सर्वात लेटेस्ट गॅझेट खरेदी करून द्या किंवा त्यांच्या अभ्यासात सहभागी व्हा.

 मुंबई - पैशांचे योग्य नियोजन हे सर्वात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. पालक या नात्याने, प्रत्येक जण आपल्या मुलांसाठी नेहमीच सर्वात उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना हवे असलेले सर्वात लेटेस्ट गॅझेट खरेदी करून द्या किंवा त्यांच्या अभ्यासात सहभागी व्हा. मुलांनी त्यांचे आयुष्य सुरक्षित आणि चांगले जगण्यासाठी तुम्ही त्यांचा पाया अधिक मजबूत करू शकता. तुम्ही लहान वयातच तुमच्या मुलांना पैशांचा वापर कसा स्मार्ट पद्धतीने करावा हे सांगितल्यास त्याचा पुढे मोठा फायदा होतो.  मुलं साधारण सात वर्षांची झाल्यावर पैसे वापरण्याच्या सवयी लावल्या जातात. एखाद्या खेळात सहभागी व्हायचे असेल किंवा पैसे वाचवायचे असतील तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मुलांना स्वतःचे पैसे कमविण्याच्या संधी निर्माण करा- मुलांना पैसे खर्च करण्याचे महत्त्व समजण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे पैसे असणे आवश्यक आहे. त्यांना कामाचा मोबदला म्हणून त्यांना विशिष्ट काम देण्याचा विचार करू शकता. कुटुंबाचा एक भाग म्हणून नियमित मदतीव्यतिरिक्त, तुम्ही त्यांना अधिक कठीण किंवा अधिक क्लिष्ट कामे सोपवू शकता आणि पॉकेटमनीप्रमाणे भत्ता ठरवू शकता. - काम पूर्ण झाल्यावर पैसे मिळतात हे मुलांना शिकवा. त्यांना नवीन खेळणी/कपडे विकत घेण्याऐवजी, ते स्वतः मिळवण्यासाठी त्यांना कामाच्या माध्यमातून पैसे कमविण्यास प्रोत्साहित करा.

तुमच्या मुलांना बजेटमध्ये सहभागी करून घ्या... तुमच्या मासिक बजेटमध्ये तुमच्या मुलांना सहभागी करून घ्या.  तुम्हाला असे वाटेल की त्यांना त्यातील बहुतेक गोष्टी समजणार नाहीत, परंतु ते त्यांचे खर्च कमी करण्यास सक्षम झालेले पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  पंखे/संगणक बंद  करून विजेची बचत करण्यापासून त्यांना शिकवण्यास सुरुवात केल्यास मुले भविष्यात मोठी गुंतवणूक करण्यास सज्ज होतील.

 बचत करण्याची सवय लावातुमची मुलं तुमच्याकडे वस्तू खरेदी करताना पाहतात. म्हणूनच, त्यांना हे शिकवणे महत्त्वाचे आहे की पैसे केवळ खर्च करण्यासाठी नसून ते बचतही करायला हवेत. त्यासाठी तुम्ही त्यांना सायकल विकत घेण्याइतके साधे उद्दिष्टही सांगून त्यासाठी बचत करण्यास प्रोत्साहित करू शकता. यामुळे मुले आयुष्यभर विवेकबुद्धीने पैसे बचत करतील.

गरज आणि इच्छा यातील फरक शिकवामुलांना त्यांना नेमकी कशाची गरज आहे आणि आपल्या इच्छेनुसार खरेदी करणे आवश्यक आहे का, यातील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उदाहरणे देत समजावून सांगा तुमच्या आवडत्या स्टोअरमध्ये खरेदी करताना काय खरेदी करत आहात हे लहान मुले अगदी बारकाईने पाहतात. तुम्ही जे मुलांना उपदेश करता ते आचरणात आणा.  मुले तुमची प्रत्येक हालचाल टिपत असतात. जेव्हा मुले बिले भरण्याबद्दल किंवा कामावर का जावे याबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा अशा गोष्टींच्या महत्त्वाबद्दल खुलेपणाने चर्चा करा.  तुम्ही पैसे कसे कमावता, बचत करणे का महत्त्वाचे आहे आणि एखादी वस्तू खरेदी करण्याबाबत योग्य निर्णय कसा घ्यावा याबद्दल त्यांच्याशी बोला.  यामुळे त्यांना पैशाचे मूल्य कळण्यासह पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबतही माहिती मिळेल. 

टॅग्स :पैसापरिवार