Join us

Rent Agreement Tips: रेंट अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी काही गोष्टींवर नजर मारा; नाहीतर... मोठे नुकसान झेला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:29 PM

अनेकदा मालकांची किंवा भाडेकरुंची नियत चांगली नसते. यामुळे सही करण्याआधी काही गोष्टींवर नजर मारावी, नाहीतर भविष्यात छोट्या छोट्या कारणावरून नुकसान होऊ शकते. 

भाडे करार (rent Agreement) हा तुमचा आणि तुमचा घरमालक यांच्यातील कायदेशीर करार असतो. यामुळे दोघांवरही भाडे कायदा आणि कराराच्या अटींशी बांधील असता. परंतू अनेकदा मालकांची किंवा भाडेकरुंची नियत चांगली नसते. यामुळे सही करण्याआधी काही गोष्टींवर नजर मारावी, नाहीतर भविष्यात छोट्या छोट्या कारणावरून नुकसान होऊ शकते. 

रेंट अ‍ॅग्रीमेंटवर स्वाक्षरी करण्यापूर्वी, तुम्ही भाड्याने घेत असलेल्या मालमत्तेचा संपूर्ण फेरफटका मारणे आवश्यक आहे. घरातील फिटिंग्ज वगैरे नीट तपासून पहा. करार नीट समजून घ्या- हे अवघड काम आहे पण करारातील काही गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. घरमालकाचे तपशील, भाड्याचा कालावधी, तिथे तुमची जबाबदारी काय आहे, अनामत रक्कम, भाडे भरण्याची तारीख आणि नूतनीकरणाच्या अटी आदी पाहून घ्याव्यात.

करार नीट वाचा आणि तुम्ही भाड्यात काय देत आहात हे समजून घ्या. वीज, पाणी यांसारख्या सेवांसाठी, तुमच्याकडून भाड्यापेक्षा जास्त रक्कम आकारली जाऊ शकते. घरमालक कधीकधी सेवा शुल्क देखील आकारतात. याशिवाय पार्किंगसाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ शकते. 

सर्व काही करारामध्ये लिहिलेले असावे. तुम्‍हाला किती डिपॉझिट भरावे लागेल आणि तुम्‍ही मालमत्ता सोडल्‍यावर किती दिवसांनंतर तुम्‍हाला डिपॉझिट परत मिळेल. जर कोणत्याही पक्षाने कराराच्या अटींचे उल्लंघन केले तर ते रद्द केले जाईल. अशा परिस्थितीत, पीडित पक्ष नुकसान भरपाईची मागणी करू शकतो. त्यामुळे, कराराच्या मुदतपूर्व समाप्तीसाठी नोटीसची वेळ आणि दंड करारामध्ये नमूद केला पाहिजे.