Lokmat Money > बिझनेस न्यूज > इथे माहिती द्या...नोटाबंदीत किती पैसे बँकेत जमा केले?

इथे माहिती द्या...नोटाबंदीत किती पैसे बँकेत जमा केले?

नविन आर्थिक वर्षात (2017-18) इन्कम टॅक्स रिटर्न भरताना (ITRs) तुम्हाला नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या पैशाची माहिती द्यावी लागणार आहे

By admin | Published: March 31, 2017 12:07 PM2017-03-31T12:07:23+5:302017-03-31T12:10:24+5:30

नविन आर्थिक वर्षात (2017-18) इन्कम टॅक्स रिटर्न भरताना (ITRs) तुम्हाला नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या पैशाची माहिती द्यावी लागणार आहे

Here's information ... How much money did the bank deposit? | इथे माहिती द्या...नोटाबंदीत किती पैसे बँकेत जमा केले?

इथे माहिती द्या...नोटाबंदीत किती पैसे बँकेत जमा केले?

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - नविन आर्थिक वर्षात (2017-18) इन्कम टॅक्स रिटर्न भरताना (ITRs) तुम्हाला नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या पैशाची माहिती द्यावी लागणार आहे. नोटाबंदीच्या काळात किती रक्कम भरण्यात आली होती, हे या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांनी कमी रक्कम भरली आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली नसल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नव्या विवरण पत्रात आधार क्रमांक देण्यासाठीही रकाना असणार आहे.
8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 या नोटाबंदीच्या काळात कर विभागात एखादी व्यक्ती किंवा संस्थेकडून बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एक नवा रकाना तयार करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवा रकाना हा पगारदार व्यक्तींसाठी आयटीआर-1 किंवा सहज अर्जही जोडण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाने नोटाबंदीच्या काळात अघोषित संपत्तीची माहिती देण्यासाठी ऑपरेशन क्लीन मनी आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) संधी दिली होती. आता इन्कम टॅक्स रिटर्नच्या नव्या रकान्याच्या माध्यमातून बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंबंधी माहिती घेण्यात येणार आहे.

Web Title: Here's information ... How much money did the bank deposit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.