Join us  

हाेऊ दे खर्च! कर्ज काढून खरेदी जोमात; भरताना मात्र कोमात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 8:38 AM

जानेवारी २०२२ मध्ये  कर्ज ३२.८७ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच यंदा त्यात २०.४ टक्के वाढ झाली आहे. टिकाऊ वस्तू ग्राहक कर्जात सर्वाधिक ४३.६ टक्के वाढ झाली. 

लोकमत न्यूज नेटववर्कनवी दिल्ली : देशातील ग्राहक खर्चात (कंझुमर स्पेंडिंग) तेजीने वाढ होत असल्याचे संकेत बँकांच्या किरकोळ कर्जांच्या वाढीतून मिळत आहेत. आयडीबीआय कॅपिटलच्या एका अहवालानुसार, जानेवारी २०२३ मध्ये बँकांचे किरकोळ कर्ज वाढून ३९.५९ लाख कोटी रुपयांचे झाले आहे.

जानेवारी २०२२ मध्ये  कर्ज ३२.८७ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच यंदा त्यात २०.४ टक्के वाढ झाली आहे. टिकाऊ वस्तू ग्राहक कर्जात सर्वाधिक ४३.६ टक्के वाढ झाली. 

पुरवठ्यापेक्षा मागणी अधिकबँक ऑफ बडोदाच्या एका संशोधन अहवालानुसार, ३१ मार्चला संपणाऱ्या वित्त वर्षात निधीपुरवठा हा मागणीच्या तुलनेत ४ लाख कोटी रुपयांनी कमी राहण्याची शक्यता आहे. त्याआधीच्या ३ वर्षांत बँकांकडे मागणीपेक्षा जास्त निधी होता.

२९.६ टक्क्यांनी वाढली क्रेडिट कार्डांवरील थकबाकी जानेवारी २०२३ मध्ये क्रेडिट कार्डांवरील थकबाकी २९.६ टक्क्यांनी वाढली. याचाच अर्थ लोक छोट्याछोट्या गरजा पूर्ण करण्यासाठीही कर्ज घेत आहेत. 

१६.७%वाढले बँकांचे एकूण कर्ज

१५.३%कर्ज वितरणात वाढ डिसेंबर २०२२ मध्ये 

टॅग्स :बँकिंग क्षेत्र