Lokmat Money > बिझनेस न्यूज > अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या

अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या

एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:11 AM2022-12-15T10:11:36+5:302022-12-15T10:13:26+5:30

एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही.

Hey Modi Government! Will petrol-diesel be cheaper now? Crude oil prices fell by 20% | अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या

अहो मोदी सरकार! आता तरी स्वस्त होणार का पेट्रोल-डिझेल? कच्च्या तेलाच्या किमती २०%नी कोसळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कच्च्या तेलाचे भाव गेल्या केवळ एका महिन्यातच जवळपास २० टक्क्यांनी कोसळले आहेत. क्रूड वर्ष २०२२ च्या आतापर्यंतच्या सर्वाधिक नीचांकी पातळीवर आले आहे. मार्च २०२२ मध्ये क्रूड ऑइल भारताला १२९ डॉलर प्रति बॅरलने मिळत होते, ते आता घसरून ७६ ते ८० डॉलर प्रति बॅरल दरम्यान आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलातील किमतीमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

यावर्षी एप्रिल महिन्यापासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना मोठे नुकसान झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने कंपन्या आता आपला तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तेलाच्या घसरलेल्या किमतीचा फायदा कमी होण्याची शक्यता आहे. 

भारताला कसा होईल फायदा? 
nकच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे भारताचे आयात बिल कमी होणार आहे.
nआयात कमी झाल्याने आपली वित्तीय तूट कमी होईल.
nकच्च्या तेलाच्या पेमेंटसाठी डॉलरची अधिक गरज लागणार नाही.
nतेलाच्या किमती कमी झाल्याने महागाई कमी होईल.

तेलाच्या किमतीत का घसरण? 
nजागतिक अर्थव्यवस्थेत अजूनही सुस्ती येण्याचे संकेत
nविकसित देशांमध्ये मंदीची भीती
nचीनमध्ये कोरोना नियमांमुळे उत्पादन ठप्प, त्यामुळे इंधन मागणी कमी झाली. चीन हा कच्च्या तेलाच्या प्रमुख आयातदारांपैकी एक आहे.
nपश्चिमी देशांकडून रशिया तेलावर ६० डॉलर प्रति बॅरलचा प्राइस कॅप

सामान्यांना याचा फायदा कमी होणार असला तरी देशाला याचा फायदा होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Web Title: Hey Modi Government! Will petrol-diesel be cheaper now? Crude oil prices fell by 20%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.