सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सध्या बेनामी संपत्तीवर खूप कडक कायदा मोदी सरकारने आणला आहे व कर चुकविणाऱ्यांना आणि बेनामी संपत्ती खरेदी करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई होणार आहे. जसे शोले चित्रपटात गब्बरसिंगला पकडण्यास इनाम राहतो. तसे बेनामीदार पकडण्यासाठी सरकारव्दारे बेनामी संपत्ती जप्त केली जाणार आहे, असे का? व हे कसे शक्य हे सांग.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, भारतात काळा पैसा रोखण्यास व कर चुकविणाऱ्यांना अद्दल घडविण्यास मागील वर्षी बेनामी प्रॉपर्टी ट्रॅन्झॅक्शन अॅक्ट १९८८ मध्ये सुधारणा करून १ नोव्हेबर २०१६ लागू केले आहे. यामध्ये बेनामी प्रॉपर्टीची जप्ती, दंडात्मक कारवाई, इ.ची माहिती दिली आहे. अनेक लोक परस्पर व्यवहार करुन बेनामी संपत्ती खरेदी करतात व त्यावर आयकर भरत नाहीत. अशा लोकांवर टाच येईल. खरोखरच बेनामीदार हे गब्बरसिंगसारखे पात्र झाले आहे. तेव्हा संपत्ती जमा करूनसुध्दा जे कर भरत नाही त्यांना शोधने सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे शासनाला या कायद्याची कडक अमलबंजावनी करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक,पॅन, बॅक अकांउट नंबर, मोबाइल नंबर इ. संगणकीकृत माहितीव्दारे सरकार कर चुकविणाऱ्या गब्बरसिंगला जेरीस आणेल. अशा योजना काळ्या पैशाच्या लढाईत उपयोगी ठरेल. अर्जुन : बेनामी व्यवहार म्हणजे?कृष्ण : अर्जुना, बेनामी व्यवहार म्हणजे ज्या व्यवहारात वा करारात खऱ्या मालकाची ओळख लपवलेली असते. कारण कोणीतरी दुसराच त्याचा मालक म्हणून दाखविला जातो. खरा मालक (बेनिफिशीयल ओनर) संपत्ती खरेदीसाठी पैसे देतो पण संपत्ती दुसऱ्याच्या नावावर (बेनामीदार) घेतो. बेनामी व्यवहार कोणतीही व्यक्ती करू शकते. म्हणजेच बेनामीदार वा बेनिफिशीयल ओनर हे व्यक्ती, एचयुएफ, फर्म, कंपनी, ट्रस्ट इत्यादी असू शकते.अर्जुन : कृ ष्णा, बेनामीदार म्हणजे कोण?कृष्ण : अर्जुना, अशा व्यक्ती ज्याच्या नावावर बेनामी संपत्ती खरेदी केली आहे वा ठेवली आहे. म्हणजेच पैसा एकाचा व संपत्ती खरेदी दुसऱ्याच्या नावाने हा व्यक्ती हयात असेल वा नसेल. बेनामीदार व्यक्ती किंवा संस्था खोटी अथवा अस्तित्वात नसेल. फक्त त्या बेनामीदार व्यक्तीचे नाव वापरुन त्याच्या नावावर संपत्ती असेल परंतु त्याचा कब्जा नसेल.अर्जुन : कृ ष्णा, बेनिफिशीयल ओनर म्हणजे कोण?कृष्ण : अर्जुना, जो व्यक्ती बेनामीदारच्या नावावर असलेली संपत्तीचा फायदा, वापर करीत आहे असा व्यक्ती. मात्र तो व्यक्ती माहीत जरी असला वा नसला तरी तो बेनिफिशीयल ओनर होतो.अर्जुन : कृष्णा, बेनामी संपत्ती म्हणजे काय?कृष्ण : अर्जुना, वरील चार प्रकारच्या बेनामी व्यवहारात कारणीभूत असलेली संपत्ती ही बेनामी संपत्ती होय. यामध्ये कोणतेही स्वरुपात असलेली संपत्ती म्हणजेच अचल संपत्ती (जमीन, घर, इ.) चल संपत्ती (नगदी, ज्वेलरी, बँक डिपॉझीट, इ.) इन्टॅन्जीबल संपत्ती (ट्रेड मार्क, गुडविल, इ.) परेदशात असलेली संपत्ती सुध्दा यामध्ये येऊ शकते.अर्जुन : बेनामी व्यवहार केल्यास दंडात्मक कारवाई काय?कृष्ण : अर्जुना, १ नोव्हेंबर २०१६ च्या आधी बेनामी व्यवहार केल्यास ३ वर्षी पर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही लागू शकते. परंतु १ नोव्हेंबर २०१६ नंतर बेनामी व्यवहार केल्यास बेनिफिशीयल ओनर, बेनामीदार वा या व्यवहाराशी इतर कोणतेही सलग्न व्यक्ती यात गुन्हेगार सिध्द झाल्यास त्याला १ ते ७ वर्षापर्यंत सश्रम कारावास होऊ शकतो. तसेच बेनामी संपत्तीच्या बाजार मुल्याच्या २५ टक्के पर्यंत दंड आकारुन नंतर ही बेनामी संपत्ती केंद्र शासन जप्त करेल. या संपत्तीदार बेनामीदार व बेनिफिशीयल ओनर कोणताही हक्क, खरेदी, विक्री, इत्यादी चा अधिकार गाजवू शकणार नाही.अर्जुन : कृष्णा, मग यातून सुटका करावयाची असल्यास, रोख रक्कम, बँक डिपॉझीट इत्यादी विशिष्ट संपत्ती प्रधान मंत्री गरीब योजनेस जाहीर करुन त्यावर सुटका मिळू शकते. सोने, चांदी, जमीन, इत्यादी वस्तू या जाहीर करता येणार नाही. ४९.९ टक्के सेस पेनल्टी एकत्रीत भरावी लागेल. २५ टक्के डिपॉझीट प्रंधान मंत्री गरीब योजनेमध्ये व्याज मुक्त चार वर्षासाठी कोणती लागेल व ही संधी ३१ मार्च २०१७ पर्यंतच उपलब्ध आहे.>उचीत कर भरा, खबरदारी घ्या!>बेनामी व्यवहाराचे चार प्रकारनोटाबंदीच्या गडबडीत ज्यांनी इतरांच्या खात्यात पैसे जमा केले असेल त्यांच्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे. बेनामी संपत्ती जप्त करुन शासन दंडात्मक कारवाई करेल. कर न भरता गब्बरसिंग सारखे वागणाऱ्यांवर आता कारवाई होईल. त्यामुळे प्रत्येकाने उचीत कर भरुन आपली गत गब्बरसिंग सारखी होऊ नये याची खबरदारी घ्यावी. अन्यथा आयकर अधिकारी जय विरुच्या रुपाने बेनामी कायद्याअंतर्गत कर चुकविणाऱ्या गब्बरसिंगला ठिकाणावर आणतील.व्यवहार अथवा करार ज्यामध्ये रक्कम ज्याच्या नावावर संपत्ती आहे ती व्यक्ती सोडून कोणीही इतर व्यक्तीने दिली तर, उदा. सांबा च्या नावावर संपत्ती आहे पण खरेदीसाठी पैसे गब्बर ने दिले. बेनामीदाराला माहितीच नाही अथवा त्याला ज्ञानच नाही असे केले गेलेले व्यवहार. उदा- गब्बर ने सुरमा भोपाली च्या जनधन खात्यात १० लाख जमा केले. पण सुरमा भोपालीला माहितीच नाही की गब्बर कोण आहे तो. बेनिफिशीयल ओनर ज्याने पैसे दिले तो खोटा आहे अथवा सापडलाच नाही असे व्यवहार उदा- रामूने संपत्तीसाठी पैसे दिले पण रामू या नावाचा व्यक्ती अस्तित्वातच नाही किंवा शोध लागण्या सारखा नाही.
अरे ओ... सांबा, बेनामी प्रॉपर्टीपर कितना इनाम रखे है सरकार
By admin | Published: March 06, 2017 4:23 AM