मिड साईज कंपनी एचएफसीएल लिमिटेड (HFCL Ltd) चा शेअर शुक्रवारी सुमारे 3 टक्क्यांनी वधारून 64.50 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी येण्यामागचे मोठे कारण म्हणजे, एचएफसीएल लिमिटेडला मुकेश अंबानींच्यारिलायन्स रिटेलकडून मिळालेली मोठी ऑर्डर. ही ऑर्डर सुमारे 65.72 कोटी रुपयांची आहे.
काय आहे ऑर्डर -एचएफसीएलने गुरुवारी स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला सर्व भागधारकांना कळविण्यात आनंद होतो की, आपली उपकंपनी एचटीएल लिमिटेडला देशात ऑप्टिकल फायबर केबल्सच्या सप्लायसाठी रिलायन्स रिटेल लिमिटेड कडून एकूण 65.72 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.'' महत्वाचे म्हणजे, HTL लिमिटेड ही आघाडीच्या खाजगी दूरसंचार ऑपरेटर्सपैकी एक आहे. कंपनीचे मार्केट कॅप ₹8,927 कोटी रुपये एवढे आहे.
तत्पूर्वी, आपल्याला ऑप्टिकल फायबर केबलच्या पुरवठ्यासाठी रिलायन्स प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडकडून ऑर्डर मिळाल्याची घोषणाही एचएफसीएलने 12 एप्रिल रोजी केली होती.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती - एचएफसीएल लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बीएसईवर ₹64.76 वर बंद झाला. जो यापूर्वीच्या ₹62.91 रुपये या बंद भावाच्या तुलनेत 2.94% अधिक आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शेअरची किंमत ₹28.15 वरून सध्याच्या शेअर प्राइसपर्यंत पोहोचली आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने 142.55% एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरची किंमत ₹10.84 वरून सध्याच्या किंमतीपर्यंत पोहोचली आहे. या कालावधीत या शेअरने 491.42% एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 4.34% ची घसरण दिसून आली आहे. तसेच YTD आधारावर, हा शेअर 2023 मध्ये आतापर्यंत 14.34% ने घसरला आहे.