Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाचक्की! Swiggy, Zomato वरुन फूड ऑर्डर बंद होणार? वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले

नाचक्की! Swiggy, Zomato वरुन फूड ऑर्डर बंद होणार? वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले

ऑनलाइन फूड ऑर्डरचं मार्केट आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. या व्यवसायात Swiggy आणि Zomato यांची जणू एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 09:55 AM2022-09-03T09:55:59+5:302022-09-03T09:57:01+5:30

ऑनलाइन फूड ऑर्डरचं मार्केट आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. या व्यवसायात Swiggy आणि Zomato यांची जणू एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे.

high commission by swiggy zomato have restaurants turning to alternatives | नाचक्की! Swiggy, Zomato वरुन फूड ऑर्डर बंद होणार? वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले

नाचक्की! Swiggy, Zomato वरुन फूड ऑर्डर बंद होणार? वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले

मुंबई-

ऑनलाइन फूड ऑर्डरचं मार्केट आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचलं आहे. या व्यवसायात Swiggy आणि Zomato यांची जणू एकाधिकारशाहीच निर्माण झाली आहे. या दोन अग्रगण्य फूड डिलिव्हरी अॅप्सची हिच एकाधिकारशाही आता रेस्टॉरंट मालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण दोन्ही अॅप्सकडून वाढत्या कमीशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले आहेत. त्यामुळे हॉटेल मालक आता स्विगी, झोमॅटोसोबतचे करार मोडण्याच्या विचारात आहेत. आता रेस्टॉरंट मालकांनी एकत्र येऊन स्विगी, झोमॅटोवरुन माघार घेतली तर काय होईल याचा विचार करा. घरबसल्या फूड ऑर्डर करणं जवळपास अशक्य होऊन जाईल. पण एक पर्याय जेव्हा बंद होतो तेव्हा दुसरा पर्याय चाचपडून नक्कीच पाहिला जातो. त्यामुळे यावर पर्यायी मार्ग शोधण्याच्या भूमिकेत रेस्टॉरंट मालक आहेत. 

वाढत्या कमिशनमुळे रेस्टॉरंट मालक वैतागले
पाच वर्षांपू्र्वी Swiggy आणि Zomato चं कमीशन जवळपास १२ टक्के इतकं होतं. २०१९ पर्यंत हे कमीशन २० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आणि सध्या सरासरी हे कमीशन २५ टक्के इतकं झालं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कमीशन देऊन व्यवसाय करणं रेस्टॉरंट मालकांना शक्य नाही. कारण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होऊनही ते अत्यंत स्पर्धात्मक बाजारपेठेत खाद्यपदार्थांच्या किमती वाढवू शकत नाहीत. तितकी वाढ करणे आवश्यक आहे. कमिशनमुळे रेस्टॉरंटच्या जेवणाच्या आणि ऑनलाइन दरांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत फरक आहे. जेफरीजच्या  अहवालानुसार, ८० टक्के रेस्टॉरंट्स एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर डाइन-इन म्हणजेच हॉटेल मेन्यूपेक्षा ६० टक्के जास्त किमती सांगत आहेत. अग्रीगेटरकडून कमीशनमध्ये वाढ करण्यात आल्यानं आम्हालाही पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागत आहेत, असं रेस्टॉरंट मालकांचं म्हणणं आहे. 

नवे स्टार्टअप मैदानात
वाढत्या कमीशनमुळे जे रेस्टॉरंट्स Swiggy आणि Zomato पासून दूर जात आहेत ते नव्या स्टार्टअप फूड डिलिव्हरी अॅप्सना पसंती देत आहेत. थ्राइव्ह आणि डॉटपे सारख्या नव्या स्टार्टअप अॅप्सना पसंती मिळू लागली आहे. जे अत्यंत कमी ५ ते ६ टक्क्यांच्या कमीशनवर काम करत आहेत. हे स्टार्टअप्स आता Swiggy आणि Zomato ला पर्याय म्हणून उदयास येऊ लागले आहेत. स्विगी आणि झोमॅटोच्या वाढत्या कमीशनमुळे नाराज झालेले रेस्टॉरंट मालक आता नव्या प्लॅटफॉर्मच्या दिशेनं पसंती देत आहेत. 

 

Web Title: high commission by swiggy zomato have restaurants turning to alternatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.