लंडन : पंजाब नॅशनल बँकेतील १७ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ््यात आरोपी असलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन बुधवारी इंग्लंड आणि वेल्सच्या हायकोर्टानेही फेटाळला.
भारताने प्रत्यार्पणासाठी दाखल केलेल्या प्रकरणात गेल्या मार्चमध्ये अटक झाल्यापासून नीरव मोदी ईशान्य लंडनमधील वॅण्ड््सवर्थ तुरुंगात आहे. प्रत्यार्पणासंबंधी सुनावणी घेणाऱ्या वेस्ट मिनस्टर न्यायालयातील मॅजिस्ट्रेट मेरी एलिझाबेथ मेलॉन यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे २७ जूनपर्यंत मोदी यास कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. मोदी याने जामिनासाठी पाच लाख पौंड जमा करण्याची तयारी दर्शवून तीन वेळा जामिनासाठी अर्ज केला. मात्र मॅजिस्ट्रेट मेलॉन यांनी तेफेटाळले होते.
याविरुद्ध मोदी याने हायकोर्टात अपील केले. त्यावर मंगळवारी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश इन्ग्रिड सिमलर यांनी मोदीचा जामीन फेटाळला. त्यामुळे प्रत्यार्पणाच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत मोदी यास तुरुंगातच राहावे लागेल. (वृत्तसंस्था)कोणत्या तुरुंगात?दरम्यान, प्रत्यार्पण प्रकरण ऐकणाºया न्यायालयाने मोदीला भारतात परत पाठविले, तर कोणत्या तुरुंगात ठेवणार याचा तपशील १४ दिवसांत देण्यास सांगितले आहे. त्यानुसार भारत सरकारने महाराष्ट्र सरकारकडून माहिती घेऊन दुसºया बँक घोटाळ््यातील आरोपी विजय मल्ल्या याच्यासाठी मुंबईच्या आॅर्थ रोज कारागृहातील जी कोठडी निवडली आहे तेथेच मोदीलाही ठेवता येईल, असे ठरविले असून तसे न्यायालयास कळविले जाईल.