Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी लागलं अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी लागलं अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचे शेअर्स NSE SME वर १४.५३ टक्के प्रीमियमसह २६० रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले. या जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:42 AM2024-03-14T11:42:58+5:302024-03-14T11:43:09+5:30

कंपनीचे शेअर्स NSE SME वर १४.५३ टक्के प्रीमियमसह २६० रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले. या जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सना ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

high listing of Shree Karni Fabcom IPO upper circuit stock on first day Investor makes huge money | 'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी लागलं अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

'या' IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी लागलं अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

Shree Karni Fabcom IPO Listing: श्री करणी फॅबकॉम आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली. कंपनीचे शेअर्स NSE SME वर 14.53 टक्के प्रीमियमसह 260 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाले. या जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. त्यामुळे शेअर्सची किंमत 273 रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 20.26 टक्क्यांचा नफा कमावला आहे.
 

या IPO चा प्राईज बँड 220 ते 227 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होता. कंपनीनं यात 600 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराला किमान 1,36,200 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 6 मार्च ते 11 मार्च या कालावधीत खुला होता. श्री करणी फॅबकॉमचा आयपीओ 42.49 कोटी रुपयांचा होता. कंपनीनं आयपीओद्वारे 18.72 लाख फ्रेश शेअर्स जारी केले आहेत. 
 

350 पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब
 

सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 11 मार्च 2024 रोजी कंपनीच्या आयपीओला 296.43 पट सबस्क्रिप्शन मिळालं. किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत या आयपीओला 330.45 पट सबस्क्रिप्शन मिळालं. हा आयपीओ या 3 दिवसांमध्ये एकूण 350 पटींपेक्षा अधिक सबस्काईब झाला.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: high listing of Shree Karni Fabcom IPO upper circuit stock on first day Investor makes huge money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.