Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानी भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख असून, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील आहेत. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की, मुकेश अंबानी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याला पगार घेतात. पण, ते नेमका किती पगार घेतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तुम्ही विचार करत असाल की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी करोडो रुपये पगार घेत असतील. पण, मुकेश अंबानींच्या कंपनीत दुसरा एक व्यक्ती आहे, ज्याचा पगार मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी आणि रिलायन्सचे व्हिजन पुढे नेणाऱ्या व्यक्तीचे नाव निखिल मेसवानी आहे, जे अंबानींपेक्षा जास्त पगार घेतात.
कोण आहे निखिल मेसवानी?
निखिल मेसवानी, हे मुकेश अंबानी यांचे गुरू रसिकलाल मेसवानी यांचे सुपूत्र आहेत. ते मुकेश अंबानींचा उजवा हात मानले जातात. निखिल मेसवानी व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहे. ते 1986 पासून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी संबंधित आहेत. निखिल रिलायन्सच्या संस्थापकांपैकी एक आहे. कंपनीचा रिफायनरी व्यवसाय त्यांनी अनेक वर्षे सांभाळला आहे. ते मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निखिल मेसवानी यांना 24 कोटी रुपये पगार मिळतो, तर त्यांचा धाकटा भाऊ हितल मेसवानी हे मुकेश अंबानींचा डावा हात मानला जातो. त्यांचा पगारही सुमारे 24 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, स्वतः मुकेश अंबानींचा पगार 14 कोटी रुपये आहे. मात्र, मुकेश अंबानी यांनी कोरोनानंतर एक रुपयाही पगार घेतलेला नाही.
1988 मध्ये संचालक मंडळाची स्थापना
मुकेश अंबानींचा उजवा हात म्हटल्या जाणाऱ्या निखिल यांना 1988 मध्ये कंपनी बोर्डाचे डायरेक्टरही बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कार्यकारी संचालकपदाची जबाबदारीही देण्यात आली. निखिलचा धाकटा भाऊ हितल 1990 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले. रिलायन्सच्या यशात या दोन भावांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं म्हटलं जाते.