मुंबई : आधुनिक किरकोळ व्यवसाय (रिटेल) क्षेत्राच्या दृष्टीने सर्वाधिक क्षमता मुंबई महानगरात आहे. मुंबईत या क्षेत्राची क्षमता जवळपास १,०५,००० कोटी रुपयांपर्यंत आहे. मुंबईनंतर राष्ट्रीय राजधानी परिसर आणि बंगळुरू सर्वाधिक क्षमतेचे शहर आहेत.
जागतिक संपत्ती सल्लागार संस्था नाईट फ्रँक आणि रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या संयुक्त अहवालानुसार मुंबई क्षेत्र किरकोळ व्यावसायिकांना वस्त्रालंकार, खाद्य व पेयपदार्थ, करमणूक तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंयासारख्या क्षेत्रात मोठा वाव आहे.
नाईट फ्रँकचे मुख्य अर्थतज्ज्ञ व संचालक (संशोधन) समान्तक दास यांनी सांगितले की, भारतात आधुनिक रिटेल आधुनिकीकरणाची गती धीमी आहे. असे असले तरी बंगळुरू २०२६, राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) २०२८ पर्यंत ५० टक्के रिटेल क्षेत्राचे आधुनिकीकरण होईल.
मुंबईत आधुनिक रिटेल क्षेत्राची सर्वाधिक क्षमता
आधुनिक किरकोळ व्यवसाय (रिटेल) क्षेत्राच्या दृष्टीने सर्वाधिक क्षमता मुंबई महानगरात आहे. मुंबईत या क्षेत्राची क्षमता जवळपास १,०५,००० कोटी रुपयांपर्यंत आहे.
By admin | Published: February 5, 2016 03:17 AM2016-02-05T03:17:18+5:302016-02-05T03:17:18+5:30