Join us

भारतात सर्वाधिक वेतन मिळते बंगळुरू शहरात; मुंबई आणि दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 2:29 AM

लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे. सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला आहे.

बंगळुरू : लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे. सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला आहे. बंगळुरूनंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागला.अभ्यासातील निष्कर्षानुसार, बंगळुरूत सरासरी १२ लाख वार्षिक वेतन मिळते. मुंबई आणि दिल्ली-एनसीआरमध्ये प्रत्येकी ९ लाख रुपये सरासरी वार्षिक वेतन मिळते. हैदराबादेत ८.५ लाख, तर चेन्नईत ६.३ लाख सरासरी वार्षिक वेतन मिळते. तंत्रज्ञान उद्योग हे सर्वाधिक वेतन देणारे क्षेत्र ठरले आहे. हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रात सरासरी १५ लाख वार्षिक वेतन दिले जाते. सॉफ्टवेअर क्षेत्रात १२ लाख, तर ग्राहक क्षेत्रात ९ लाख वार्षिक वेतन मिळते. हार्डवेअर क्षेत्रातील चीप डिझाईन व नेटवर्किंग क्षेत्रातील जाणकारांना सर्वाधिक वेतन मिळते. चीप डिझायनिंग अभियंत्यांच्या वेतनात प्रचंड वाढ झाली आहे. (वृत्तसंस्था)यांचा अधिक लाभसिस्कोचे सीआयओ व्ही. सी. गोपालरत्नम यांनी सांगितले की, डाटा वितरणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नेटवर्किंग क्षेत्रात नव्या कौशल्याची गरज निर्माण झाली आहे. ते असणाºयांना व त्या क्षेत्रातील जाणकारांना वेतनही भरघोस मिळते.

टॅग्स :मुंबई