Lokmat Money > बिझनेस न्यूज > Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का

Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का

Tax : आता नवीन कर स्लॅबमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:52 PM2023-02-06T18:52:42+5:302023-02-06T18:52:57+5:30

Tax : आता नवीन कर स्लॅबमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.

highest tax playing companies in india tcs tata steel reliance | Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का

Tax : भारतात सर्वाधिक कर कोण भरतो? नाव वाचून बसेल धक्का

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकताच 2023 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने आयकर स्लॅबचे दर वाढवले ​​आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता नवीन कर स्लॅबमध्ये वार्षिक 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा 2023 च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का भारतात सर्वाधिक कर कोण भरतो?

कर
भारतात अनेक मोठ्या कंपन्या व्यवसाय करत आहेत. यापैकी काही कंपन्या अशाही आहेत, ज्यांचा व्यवसाय देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. दुसरीकडे, आज आम्ही तुम्हाला अशा कंपन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतात जास्तीत जास्त कर भरतात. भारतात सर्वाधिक कर भरणाऱ्या कंपन्यांबद्दल जाणून घेऊया....

करदाते
Ace Equity वर मिळालेल्या माहितीनुसार, आज आम्ही तुम्हाला आर्थिक वर्ष 2022 (FY22) मधील भारतातील टॉप 15 करदात्यांची माहिती देणार आहोत. आकडेवारीवरून समजते की आर्थिक वर्ष 2022 मध्ये 15 लिस्टेड कंपन्या आहेत, ज्यांनी किमान 5,000 कोटी रुपयांचा कर भरला आहे, तर एकूण 60 कंपन्यांनी किमान 1,000 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

रिलायन्स
आर्थिक वर्ष 2022 च्या आकडेवारीनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कंपनीने सर्वाधिक करदात्यांमध्ये 16,297 कोटी रुपये जमा केले. एसबीआयने 13,382 कोटी रुपयांचा कर भरला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने 13,238 कोटी रुपयांचा कर भरला आहे. याशिवाय एचडीएफसी (HDFC) बँक चौथ्या क्रमांकावर आहे. एचडीएफसी बँकेने 12,722 कोटींचा कर जमा केला होता. तर वेदांताने 9,255 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

टाटा स्टील
जेएसडब्ल्यू स्टीलने 8,807 रुपयांचा कर भरला आहे. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा सातव्या क्रमांकावर समावेश असून, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 8,562 कोटी रुपयांचा कर भरला आहे. यानंतर टाटा स्टीलचे नाव आहे. टाटा स्टीलने 8,478 कोटी रुपयांचा कर भरला. तसेच, आयसीआयसीआय बँकेने 8,457 कोटी रुपये कर भरला. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) दहाव्या स्थानावर आहे. एलआयसीने 8,013 कोटी रुपयांचा कर भरला होता.

इन्फोसिस
यानंतर इन्फोसिसने 7,964 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर कोल इंडियाने  6,238 कोटी रुपये, हिंडाल्को इंडस्ट्रीजने 5,373 कोटी रुपये, आयटीसीने  5,237 कोटी रुपये आमि एनटीपीसीने 5,047 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

Web Title: highest tax playing companies in india tcs tata steel reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर