Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा महिनाभरातील उच्चांक

सोन्याचा महिनाभरातील उच्चांक

जगभरातील वाढती खरेदी आणि आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेता स्थानिक जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोन्याने आज १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी उसळी

By admin | Published: October 8, 2015 05:04 AM2015-10-08T05:04:22+5:302015-10-08T05:04:22+5:30

जगभरातील वाढती खरेदी आणि आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेता स्थानिक जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोन्याने आज १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी उसळी

Highs in the month of gold | सोन्याचा महिनाभरातील उच्चांक

सोन्याचा महिनाभरातील उच्चांक

नवी दिल्ली : जगभरातील वाढती खरेदी आणि आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेता स्थानिक जवाहिऱ्यांनी चालविलेली खरेदी यामुळे सोन्याने आज १० ग्रॅममध्ये २०० रुपयांनी उसळी घेत महिनाभरातील २६,८५० असा उच्चांकी भाव गाठला. चांदीनेही सलग तिसऱ्या दिवशी आगेकूच करीत किलोमागे ५०० रुपयांची झेप घेत ३७,२५० रुपये असा दर गाठला.
यंदा अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याची शक्यता नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जगभरात सोन्याला मागणी वाढली आहे. जागतिक स्तरावर लंडन येथे सोने ०.१२ टक्क्यांनी वाढून १,१४९.०० अमेरिकी डॉलर प्रती औंस झाले.
चांदीच्या नाण्यांचे भाव १५०० रुपयांनी वाढले. चांदीच्या १०० नाण्यांच्या खरेदीचा भाव ५२,५०० रुपये, तर विक्रीचा दर ५३,५०० रुपये होता. सणासुदीच्या काळात सोने-चांदी आणखी वाढू शकते, असे सूत्रांनी म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Highs in the month of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.