Join us

महामार्गांमुळे जीडीपी वाढेल ३ टक्क्यांनी, १ कोटी नव्या नोक-या निर्माण होणार- नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 3:56 AM

नवी दिल्ली : सरकारच्या महामार्ग विकास योजनेमुळे देशाच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नात ३ टक्क्यांची भर पडेल, तसेच १ कोटी नवे रोजगार निर्माण होतील, असे प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नवी दिल्ली : सरकारच्या महामार्ग विकास योजनेमुळे देशाच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नात ३ टक्क्यांची भर पडेल, तसेच १ कोटी नवे रोजगार निर्माण होतील, असे प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.गडकरी म्हणाले की, सरकारने पाच वर्षांत ८३ हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याची योजना आखली आहे. गेल्या तीन वर्षांत ६ लाख कोटींची कामे वितरित झाली आहेत. २०१९पूर्वी १५ लाख कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे. या कामांमुळे सिमेंट आणि उपकरणे बनविणाºया कंपन्यांसह बांधकाम क्षेत्रात १०० टक्के वृद्धी दिसेल. जीडीपीमध्ये ३ टक्के वाढ होईल. १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतमाला योजनेंतर्गत आम्ही ६० हजार कि.मी. लांबीचे रस्ते बांधणार आहोत. त्यावर ८ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाचा तपशील तयार आहे. त्यात ३४,८०० कि.मी. लांबीचे रस्ते बांधले जातील. त्यावर ५.३५ लाख कोटी खर्च होईल. दुसºया टप्प्यात २५,२०० कि.मी. लांबीचे रस्ते बांधले जातील, असे गडकरी म्हणाले.>द्रुतगती मार्ग आणि आर्थिक कॉरिडॉर यांची कामे प्रथम प्राधान्याने करण्यात येतील. आमच्या हाती ५० आर्थिक कॉरिडॉर आहेत. त्यांची लांबी ९ हजार कि.मी. आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर 3,300 कि.मी. लांबीचे सीमा रस्ते बांधण्यात येतील. राष्ट्रीय महामार्गांवर ४० टक्के मालवाहतूक होते. ती ७० ते ८० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. भारतमाला योजनेंतर्गत 550 जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडले जातील. सध्या केवळ 300 जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेले आहेत. भारतमाला उपक्रमाने रस्ते बांधकामास आणखी गती मिळेल. त्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आणखी निधी मागणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :नितीन गडकरी