Hindenburg Impact: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research) अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या अडचणी वाढत आहेत. आता सिटीग्रुपच्या वेल्थ आर्मने मार्जिन लोनसाठी कोलॅटरल (गॅरंटी) म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे सिक्युरिटीज घेणे बंद केले आहे. कारण हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप केला आहे आणि तेव्हापासून बँकांनी अदानी समूहाच्या कंपन्यांची छाननी वाढवली आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सिटीग्रुपने एका इंटरनल मेमोमध्ये म्हटले आहे की अदानीच्या सिक्युरिटीजमध्ये अलीकडच्या काही दिवसांत तीव्र घसरण दिसून आली आहे. अदानी समूहाच्या आर्थिक स्थितीबद्दलच्या नकारात्मक बातम्यांमुळे त्याचे स्टॉक आणि बाँडच्या किमती घसरल्या आहेत. अशा परिस्थितीत, सिटीग्रुपने अदानी समूहाच्या सिक्युरिटीजची लँडिंग व्हॅल्यू तात्काळ काढून टाकण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्यांच्या हमीवर कर्ज मिळू शकत नाही. सिटीग्रुपचा हा निर्णयही तत्काळ लागू झाला आहे. मात्र, सिटीग्रुपच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला.
लँडिंग व्हॅल्यू झिरो करण्याचा अर्थ काय?जेव्हा खाजगी क्षेत्रातील बँक लँडिंग व्हॅल्यू शून्य करते, तेव्हा ग्राहकांना सामान्यत: रोख रक्कम किंवा इतर कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागते. जर ते तसे करण्यात अयशस्वी ठरले, तर त्यांचे सिक्युरिटीज लिक्विडेट केले जाऊ शकते. सिटीग्रुप व्यतिरिक्त, स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुईसच्या खाजगी बँकिंग शाखेने देखील अदानी पोर्ट्स आणि एसईझेड, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईच्या नोट्सची लँडिंग व्हॅल्यू झिरो केली आहे.