Join us

अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 5:21 PM

Roblox Corporation Hindenburg report: अदानी समूह, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यानंतर हिंडेनबर्ग रिपोर्टने गेमिंग कंपनी roblox वर गंभीर आरोप केले आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. 

Hindenburg report Roblox Corporation: अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिपोर्टने पुन्हा एकदा मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. हिंडेनबर्गने गेमिंग कंपनीवर आरोप केले आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर कंपनीच्या शेअर्स घसरले आहेत. हिंडेनबर्गने ऑनलाइन गेमिंग कंपनी Roblox Corporation वर आरोप केले आहेत. यापूर्वी हिंडेनबर्गने यापूर्वी अदानी समूह आणि नंतर सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बूच यांच्यावर आरोप केलेले आहेत. 

रोब्लाक्स (Roblox) वर हिंडेनबर्गचा आरोप काय?

हिंडेनबर्गने म्हटले आहे की, Roblox कपंनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या यूजर्संच्या आकडेवारीबद्दल गुंतवणूकदार आणि  नियामकांना (Regulator) खोटी माहिती दिली आहे. हिंडेनबर्गच्या या आरोपानंतर शेअर बाजार उघडताच कंपनीचे शेअर घसरले. 

Roblox ने त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 25 ते 42 टक्के वाढून सांगितली. त्याचबरोबर Roblox त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एंगजमेंट तासांचा कालावधीही 100 टक्क्यांहून जास्त दाखवला आहे. डेली ॲक्टिव्ह यूजर्सच्या व्याख्येचा चुकीचा अर्थ लावून तो दाखवण्यात आला. हे आकडे बॉट्स किंवा इतर पर्यायी खात्यांवरून वाढवण्यात आले आहेत. 

 Roblox काय आहे?

रोब्लाक्स हा प्लॅटफॉर्म विशेषत लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा गेमिंग प्लॅटफॉर्म कंन्सोल, स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि कम्प्युटरवर सहजपणे वापरता येतो. या कंपनीसाठी अमेरिकेत उन्हाळ्यात दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या खूप फायद्याच्या ठरतात. कारण याच काळात जास्त लोक या प्लॅटफॉर्मवर येतात आणि वेळ घालवतात. 

पण, आता हिंडेनबर्गने कंपनीकडून आकडेवारीबद्दल करण्यात आलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचा आरोप केला आहे. रोब्लाक्सने आकडे फुगवून सांगितले असल्याचा रिपोर्ट आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चलबिचलता वाढली असून, त्याचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर किंमतीवर झाला आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारसेबीअदानी