Join us  

हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 10:24 AM

Gautam Adani News : अदानींचं साम्राज्य हादरवणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला सेबीनं ४६ पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Gautam Adani News : अदानींचं साम्राज्य हादरवणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला सेबीनं ४६ पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे कंपनीनं सेबीवरच पलटवार करत फसवणुकीला संरक्षण दिल्याचा आरोप केला. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गनं अदानी समूहावर शेअर्समध्ये हेराफेरी आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता. यासंदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे.

हिंडेनबर्गने खुलासा केला की सेबीनं गेल्या वर्षी अदानी समूहाविरुद्ध केलेल्या शॉर्ट बेटवर संशयास्पद उल्लंघनाचा खुलासा करणारे पत्र पाठवलं आहे आणि खुलासा केला आहे की ते आपल्या ट्रेडवर "ब्रेक इव्हनच्या वर येऊ शकत नाहीत". कोटक बँक या भारतीय कंपनीने ऑफशोर फंड स्ट्रक्चर तयार केलं आणि त्यावर देखरेख ठेवली, ज्याचा वापर इनव्हेस्टर पार्टनरनं समूहाविरुद्ध बेट लावण्यासाठी केला. यामुळे ट्रेडचे नवे तपशील समोर आले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार हैराण झाले आहेत, असं हिंडेनबर्गनं म्हटल्याची माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिली.

'दरम्यान, आमच्या रिपोर्टनंतर सेबीनं पडद्यामागून ब्रोकर्सवर अदनींच्या शेअर्समध्ये शॉर्ट पोझिशन्सना बंद करण्याबाबत दबाव टाकला. यामुळे खरेदीसाठी दबाव तयार झाला आणि अदानी समूहाच्या शेअर्सना त्याचा फायदा झाला,' असंही त्यांनी नमूद केलंय. याशिवाय त्यांना इनव्हेस्टर्स रिलेशनशिपकडून अदानी शॉर्ट्सशी संबंधित गेनच्या माध्यमातून ४.१ मिलियन डॉलर्सचा ग्रॉस रेव्हेन्यू मिळाला आणि अदानींच्या यूएस बाँड्सच्या शॉर्ट पोझिशनच्या माध्यमातून केवळ ३१ हजार डॉलर्स कमावल्याचं फर्मनं म्हटलं. त्यांनी यात गुंतवणूकदाराच्या नावाचा खुलासा केला नाही.

'धमकावण्याचा प्रयत्न'

सेबीची कारणे दाखवा नोटीस म्हणजे धमकावण्याचा प्रयत्न असल्याचं हिंडेनबर्गनं म्हटलं. 'हिंडेनबर्गच्या अहवालात वाचकांची दिशाभूल करण्यासाठी खोटी विधानं असल्याचा अस्पष्ट आरोप नियामकानं केला आहे. तुम्हाला माहित आहे का? फक्त ५% भारतीयांना आपले पैसे कसे गुंतवायचे हे माहीत आहे,' असं हिंडेनबर्गनं म्हटलंय. 'आमच्या मते सेबीनं आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं आहे, ते फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचं दिसून येतंय,' असंबी हिंडेनबर्गनं म्हटलं. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने नियामकाला आरोपांची चौकशी करण्यास सांगितल्यानंतर सेबीनं आमच्या अहवालातील अनेक महत्त्वाच्या निष्कर्षांशी सहमती दर्शवली होती. त्यानंतर सेबीनं अधिक तपास करण्यास असमर्थ असल्याचं सांगितल्याचंही त्यानं नमूद केलं.

टॅग्स :गौतम अदानीअदानीसेबी