Join us

भारतातील अदानी दिसले, पण स्वत:च्याच देशातील सिलिकॉन व्हॅली बँक दिसली नाही; हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 6:57 PM

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत निगेटीव्ह रिपोर्ट जारी केला.

नवी दिल्ली-

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गनं २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत निगेटीव्ह रिपोर्ट जारी केला. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर चुकीचे काम केल्याचा आरोप केला. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या खात्यांमध्ये फेरफार करणे, शेअर्सच्या किंमती वाढवणे असे गंभीर आरोप केले. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्सना गटांगळी सुरू झाली. अदानीचे शेअर ८५ टक्क्यांपर्यंत घसरले. कंपनीचे बाजारमूल्य १४० अब्ज डॉलरपर्यंत घसरले. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानीच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली. आता अमेरिकन बँक डबघाईला निघाली असताना हिंडेनबर्गच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीनंतर आणि बँकेला टाळे ठोकल्यानंतर लोक सोशल मीडियावर हिंडेनबर्गला प्रश्न विचारत आहेत. हिंडेनबर्गच्या हेतूवर शंका घेतली जात आहे. हिंडेनबर्गवर बरीच टीका होत आहे. अदानी समूहावरील हिंडेनबर्गचे आरोप सिलिकॉन व्हॅली बँकेशी जोडण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. हिंडेनबर्ग यांनी भारतात अदानी समूहाची दुरवस्था पाहिली, पण त्यांच्या देशात एवढी मोठी घटना घडताना दिसली नाही, असा सवाल लोक करत आहेत. त्यांना आपल्या देशात बँकिंग घोटाळे होताना दिसले नाहीत. हिंडेनबर्ग यांच्या आरोपांवर शंका घेतली जात आहे. 

हिंडनबर्गच्या अहवालावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिंडेनबर्गने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी अदानींच्या कंपन्यांचे अहवाल प्रसिद्ध केले, असे प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आले आहेत. हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध अल्पविक्रीच्या माध्यमातून नफा मिळवण्यासाठी अहवाल जारी केला. आता सिलिकॉन व्हॅलीबाबत त्यांनी मौन बाळगल्याने त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अभिनेते विंदू दारा सिंग यांनी म्हटलं की, हिंडेनबर्ग यांनी अदानींवर आरोप केले, परंतु त्यांना सिलिकॉन व्हॅली बँकेचा गोंधळ दिसला नाही याचे आश्चर्य वाटले. सिलिकॉन व्हॅली बँक त्याच्या गैरकारभारामुळे कोसळते, परंतु हिंडनबर्गला ते दिसत नाही. हिंडेनबर्गचे संशोधन किती अचूक होते हे यातून दिसून आले, असा टोला लगावत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अदानी समूहाच्या अहवालाबाबत लोक आता हिंडेनबर्गच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :गौतम अदानी