Join us  

Hindenburg Vs Adani Group: 'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:21 AM

Hindenburg Vs Adani Group: . स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केलाय.

Hindenburg Vs Adani Group: . स्विस अधिकाऱ्यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गनं पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केलाय. तसंच २०२१ पासून ही चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. हिंडेनबर्गनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावर आता अदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं हे आरोप निरर्थक, अतार्किक आणि बिनबुडाचे असल्याचं सांगत स्विस कोर्टाच्या कोणत्याही कार्यवाहीत अदानी समूहाचा सहभाग नाही आणि आमच्या कंपनीचं कोणतंही खातं कोणत्याही प्राधिकरणानं गोठवलेलं नाही, असं म्हटलंय.

"आमच्या समूहाच्या प्रतिष्ठेला आणि बाजारमूल्याला हानी पोहोचविण्यासाठी एकाच गटानं एकत्र काम करण्याचा हा आणखी एक सुनियोजित आणि प्रामाणिक प्रयत्न आहे हे सांगण्यास आम्हाला संकोच वाटत नाही," असंही अदानी समूहानं म्हटलंय. या आदेशातही स्वित्झर्लंडच्या न्यायालयानं आमच्या समूहातील कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही किंवा अशा कोणत्याही प्राधिकरण किंवा नियामक संस्थेकडून आम्हाला असं कोणतंही स्पष्टीकरण किंवा माहितीची विनंती मिळालेली नाही, असंही त्यांनी नमूद केलं. आमची परदेशी होल्डिंग संरचना पारदर्शक, पूर्णपणे उघड आणि सर्व संबंधित कायद्यांचे अनुपालन करणारी असल्याचा आम्ही पुनरुच्चार करतो असंही त्यांनी म्हटलं.

काय म्हटलं हिंडेनबर्गनं?

अदानी समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग आणि सिक्युरिटीज फ्रॉडच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून स्विस अधिकाऱ्यांनी सहा स्विस बँक खात्यांमध्ये जमा केलेली ३१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोठवली असल्याचा आरोप हिंडेनबर्गनं केलाय. अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्ग ग्रुपनं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्विस क्रिमिनल कोर्टाच्या रेकॉर्डचा हवाला देत ही माहिती दिली. २०२१ पासून सुरू असलेल्या या तपासात भारतीय समूहाशी संबंधित संशयित ऑफशोर कंपन्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आल्याचंही हिंडेनबर्गनं म्हटलंय.

 

 

टॅग्स :गौतम अदानीअदानी