Lokmat Money > बिझनेस न्यूज > बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी

बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी

Gautam Adani: आमची बदनामी करून नफा कमावणे हाच जानेवारीमध्ये जारी करण्यात आलेल्या अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग अहवालाचा उद्देश होता, असे प्रतिपादन अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:58 AM2023-06-28T06:58:50+5:302023-06-28T06:59:15+5:30

Gautam Adani: आमची बदनामी करून नफा कमावणे हाच जानेवारीमध्ये जारी करण्यात आलेल्या अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग अहवालाचा उद्देश होता, असे प्रतिपादन अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी केले. 

Hindenburg's intention was to make profit by defamation: Gautam Adani | बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी

बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी

नवी दिल्ली : आमची बदनामी करून नफा कमावणे हाच जानेवारीमध्ये जारी करण्यात आलेल्या अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग अहवालाचा उद्देश होता, असे प्रतिपादन अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी केले. 

अदाणी समूहाच्या वतीने वित्त वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात गौतम अदाणी यांनी भागधारकांना सांगितले की, आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकास्थित शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गने एक अहवाल प्रकाशित केला. तेव्हा आम्ही भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग’ (एफपीओ) लॉन्च करण्याची योजना बनवीत होतो. या अहवालामुळे आम्ही एफपीओ परत घेण्याचा तसेच गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला.

अदाणी यांनी सांगितले की, हिंडेनबर्गचा अहवाल हा हेतुत: पसरविण्यात आलेली चुकीची माहिती आणि चुकीचे आरोप यांचे मिश्रण होता. अहवालाचे अनेक प्रतिकूल परिणाम समोर आले. आम्हाला त्यांचा सामना करावा लागला. आम्ही आरोपांचे तातडीने खंडन केले, तरीही विभिन्न स्वार्थी गटांनी शॉर्ट सेलरच्या दाव्यांचा संधिसाधू पद्धतीने फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. या संस्थांनी विभिन्न वृत्त आणि समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवरून खोट्या 
कहाण्या पसरविल्या.

अपयशाचे पुरावेच नाहीत
या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली. समितीला कोणत्याही प्रकारे नियामकीय अपयशाचे पुरावे सापडले नाहीत.  सेबीने अद्याप आपला अहवाल सादर केलेला नाही. तथापि, त्यांनाही आपले व्यवस्थापन आणि घोषणा मानक याबाबत खात्री आहे.    - गाैतम अदाणी 

Web Title: Hindenburg's intention was to make profit by defamation: Gautam Adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.