मुंबई : तीन व्यावसायिक सत्रांच्या घसरणीनंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुमारे ११ अंकांनी वाढला.धातू, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि आयटी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी राहिल्यामुळे बाजारात तेजीने प्रवेश केला. धातू क्षेत्रातील कंपन्यांनी विक्रीत आघाडी घेतल्याचे दिसून आले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह २८,१४४.२८ अंकांवर उघडला होता. मधल्या सत्रात त्यात घसरण सुरू झाली. सत्राच्या अखेरीस २१.२0 अंक वाढून सेन्सेक्स २८,0८२.३४ अंकांवर बंद झाला. निफ्टी ११.२0 अंकांनी वाढून ८,७0८.८0 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो दिवसभर चढ-उतार दर्शवित होता. (प्रतिनिधी)
सेन्सेक्सला हिंदोळे
By admin | Published: October 11, 2016 5:17 AM