Lokmat Money > बिझनेस न्यूज > एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा

एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा

31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 12:28 AM2022-04-02T00:28:43+5:302022-04-02T00:29:21+5:30

31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे.

Hindustan aeronautics limited HAL scales record highs with rs 24000 crore revenue, share price above 2 percent | एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा

एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा


सरकारी एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL)ला गेल्या आर्थिक वर्षात प्रचंड नफा झाला आहे. यामुळे कंपनीच्या शेअरची किंमतही झपाट्याने वाढली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, कंपनीचा शेअर बीएसई इंडेक्सवर 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह 1520 रुपयांवर पोहोचला. बाजार भांडवलासंदर्भात बोलायचे झाल्यास, ते 50,850 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

कंपनीचा नफा -  
31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे. हा नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सहा टक्क्यांनी अधिक आहे आणि आतापर्यंतचाही सर्वाधिकच आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 22,755 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

एचएएलचे अध्यक्ष आर माधवन म्हणाले, "गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली आव्हानं आणि उत्पादनात घट झाली असतानाही  कंपनीने महसूल वाढीचे लक्ष्य गाठले आणि चांगली कामगिरीही केली.’’

Web Title: Hindustan aeronautics limited HAL scales record highs with rs 24000 crore revenue, share price above 2 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.