Join us

HUL product price hike: घरखर्च भागवता भागवता घाम निघणार; Surf Excel, Rin ते Lifebuoy साबणापर्यंतचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 9:21 AM

HUL product price hike: फास्ट मूव्हिंग कंझ्यूमर गुड्स (FMCG) कंपन्यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. यामुळे आपल्य़ावर दर वाढविण्याचा दबाव वाढत होता.

HUL product price hike: हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. यामुळे महागाईने होरपळलेल्या गृहिणींचा घरखर्च भागविताना घाम निघणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरने सर्फ एक्सलपासून लाईफ बॉय (Lifebuoy) साबणापर्यंतच्या किंमती वाढविल्या आहेत. ही उत्पादने सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. (Surf Excel, Rin, Lifebuoy Will Now Cost More As Hindustan Unilever Hikes Prices )

हिंदुस्थान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनांच्या किंमती 3.5 टक्के ते 14 टक्क्यांपर्यंत वाढविल्या आहेत. सर्वाधिक वाढ ही कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी पावडर, साबण सर्फ एक्सेल (Surf Excel) सारख्या हाय एंड उत्पादनामध्ये झाली आहे. सर्फ एक्सल ईझीच्या एक किलोच्या पॅकेटचा दर हा 100 रुपयांनी वाढून 114 रुपये झाला आहे. 

फास्ट मूव्हिंग कंझ्यूमर गुड्स (FMCG) कंपन्यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या मालाची किंमत वाढली आहे. यामुळे आपल्य़ावर दर वाढविण्याचा दबाव वाढत होता. या कारणामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने लाँड्री ते स्किन क्लिनिंग कॅटेगरीमधील उत्पादनांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  cnbctv18 नुसार कंपनीने ही 3.5 ते 14 टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. 

अशाचप्रकारे छोट्या पाकिटांमध्ये असलेल्या उत्पादनांतील क्वांटीटी कमी करत दर तेवढेच ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजे 250 ग्रॅमच्या एका सर्फ एक्सलच्या पाकिटाची किंमत जर 50 रुपये असेल तर आता 50 रुपयांत 220 ते 230 ग्रॅमच सर्फ एक्सल मिळणार आहे. पाम तेलापासून अन्य प्रकारच्या कच्च्या मालाचे किंमत वाढल्याने ही दरवाढ अटळ ठरली आहे. अशाच प्रकारचा निर्णय अन्य कंपन्यांनी घेतल्यास साऱ्याच वस्तूंचे दर वाढले तर घरखर्च भागविणे कठीण जाणार आहे. 

टॅग्स :महागाई