मुंबई- आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार जोरदार उसळी घेत उघडला आहे. सोमवारी शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्सनं नवा रेकॉर्ड केला आहे. बाजार खुलताच क्षणी सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, तर निफ्टीनंही 10910 या नव्या आकड्याला गवसणी घातली. मुंबई शेअर बाजारातील 30 शेअर्सचे निर्देशांक 98.33 अंकांनी मजबूत होऊन 35,609.91 पर्यंत गेला आहे.
तर दुसरीकडे 50 शेअर्सचा राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीतही 16.90 अंकांची वाढ होऊन तो 10,911.60पर्यंत पोहोचला आहे. सोमवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजारातील 821 शेअर्स वधारल्याचंही पाहायला मिळालं. यादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज 1.5 टक्के, ओएनजीसी 5 टक्के, एचडीएफसी शेअर 1 टक्क्यापर्यंत वधारले आहेत. विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय सारख्या बँकांचे शेअर्स मात्र काहीसे नीचांकी पातळीवर होते.ज्युबिलंड फुडवर्क्स 4 टक्के, जयप्रकाश असोसिएट्स 8 टक्के, ओमेक्स ऑटोचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
अपोलो मायक्रो सिस्टीमच्या शेअर्सनं घेतली उसळी
बाजारमध्ये आज अपोलो शेअर बाजारानंही मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे. बीएसईमध्ये अपोलो मायक्रोसिस्टीमचा शेअर्स 73 टक्क्यांच्या प्रीमियमसह वधारला आहे. बीएसईवर अपोलो मायक्रोसिस्टीम्सचा शेअर्स 478 रुपये प्रतिशेअर भावानं वाढला आहे.
शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी, सेन्सेक्स, निफ्टीनं केला रेकॉर्ड ब्रेक
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार जोरदार उसळी घेत उघडला आहे. सोमवारी शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्सनं नवा रेकॉर्ड केला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 12:56 PM2018-01-22T12:56:30+5:302018-01-22T12:56:46+5:30