टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. ३५ वर्षीय विराट कोहलीनं क्रिकेटच्या मैदानावर जशी चमकदार कामगिरी केलीये, तसाच व्यावसायिक क्षेत्रातही त्यानं आपलं नाव तयार केलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची एकूण संपत्ती १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. विराट कोहलीनं अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. याशिवाय तो मान्यवरसह काही कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. आज आपण विराट कोहलीनं कोणत्या लोकप्रिय ब्रँडमध्ये गुंतवणूक केलीये हे पाहू.
Blue Tribeएका रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी देशातील या प्लांट-बेस्ड मीट स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक रेज कॉफीमधील गुंतवणुकीपूर्वीच करण्यात आली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
Chisel Fitness२०१५ मध्ये, विराट कोहलीनं देशभरात जिम आणि फिटनेस सेंटर सुरू करण्यासाठी Chisel Fitness आणि CSE सोबत भागीदारी केली. एका रिपोर्टनुसार, कोहलीनं या व्यवसायात सुमारे ९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फिटनेस आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत करत असल्याचं विराट म्हणतो.
Rage Coffeeमीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने गेल्या वर्षी कॉफी ब्रँड Rage Coffee मध्ये गुंतवणूक केली होती. हा दिल्ली-बेस्ड एफएमजीसी ब्रँड २०१८ मध्ये लॉन्च झाला होता. त्यांची देशभरात २५०० हून अधिक स्टोअर्स आहेत आणि ती स्टारबक्स आणि नेसकॅफे यांच्याशी स्पर्धा करत आहेत. विराट कोहलीच्या गुंतवणुकीपूर्वी, ब्रँडनं सीरिज A फंडींगमधन सुमारे ५० लाख डॉलर्सचा निधी उभारला होता.
Universal Sportsbiz Pvt Ltdमीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीनं युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ प्रायव्हेट लिमिटेडमध्येही गुंतवणूक केली आहे. या कंपनीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचीही गुंतवणूक आहे. विराट कोहलीनं २०२० मध्ये या फॅशन स्टार्टअपमध्ये १९.३ कोटी रुपये गुंतवले होते.
Hypericeविराट कोहलीनं २०२१ मध्ये ग्लोबल वेलनेस ब्रँड Hyperice मध्ये गुंतवणूक केली आणि त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला. ग्लोबल सुपरस्टार Erling Haaland, Ja Morant, Naomi Osaka आणि Rickie Fowler शी संबंधित आहेत. मात्र विराट कोहलीनं या कंपनीत किती गुंतवणूक केली आहे हे स्पष्ट झालेलं नाही.
Digital Insuranceविराट कोहली आणि अनुष्का शर्मानं २०२० मध्ये डिजिट इन्शुरन्समध्ये २.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कॅनाडातील भारतीय वंशाचे अब्जाधीश प्रेम वत्स यांचं स्टार्टअप आहे. कंपनीनं तीन वर्षांत ८.४ कोटी रुपयांचा फंड उभा केला. याचं व्हॅल्युएशन आता ८७ कोटी डॉलर्सवर पोहोचलं.
Digitपुण्याची स्टार्टअप इन्शुरन्स कंपनी डिजिटमध्येही विराट आणि अनुष्का शर्मा यांनी २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केलीये. कंपनीत त्यांचा हिस्सा ०.२५ टक्के आहे. याशिवाय त्यांनी लंडनचं सोशल मीडिया स्टार्टअप Sport Convo मध्येही गुंतवणूक केलीये. एथलिट्स आणि त्यांचे फॅन्स यांच्यातील गॅप कमी करण्याच्या दिशेत ही कंपनी काम करतेय.
Galactus Funware Technology Pvt Ltd२०१९ मध्ये विराटनं बंगळुरूतील स्टार्टअप कंपनी Galactus Funware Technology Pvt Ltd. मध्ये गुंतवणूक केली होती. ही कंपनी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म एमपीएल चालवते. कोहलीनं या कंपनीसह १० डील्स केल्या होत्या. २०२० मध्ये कंपनी टीम इंडियाची ऑफिशियल किट स्पॉन्सरही बनली होती.