Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात निर्देशांकाच्या घसरणीची हॅट्ट्रिक

शेअर बाजारात निर्देशांकाच्या घसरणीची हॅट्ट्रिक

गॅस दरवाढीचा पुढे ढकललेला निर्णय, अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीबाबतची चिंता अशा विविध बाबींनी बाजाराच्या वाढीला ब्रेक लावला.

By admin | Published: June 29, 2014 11:58 PM2014-06-29T23:58:23+5:302014-06-29T23:58:23+5:30

गॅस दरवाढीचा पुढे ढकललेला निर्णय, अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीबाबतची चिंता अशा विविध बाबींनी बाजाराच्या वाढीला ब्रेक लावला.

Hittic fall in the stock market | शेअर बाजारात निर्देशांकाच्या घसरणीची हॅट्ट्रिक

शेअर बाजारात निर्देशांकाच्या घसरणीची हॅट्ट्रिक

>आगामी अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांचा सावध पवित्र, इराकमधील वाढत्या हिंसाचाराने तेथील पेचप्रसंगात झालेली वाढ, सरकारने गॅस दरवाढीचा पुढे ढकललेला निर्णय, अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीबाबतची चिंता अशा विविध बाबींनी बाजाराच्या वाढीला ब्रेक लावला. 
सलग तिस:या सप्ताहात बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांची चढती कमान कायम आहे हे
विशेष.
गतसप्ताहातील पाच दिवसांपैकी तीन दिवस बाजाराचा निर्देशांक खाली आला तर अवघे दोन दिवस त्यामध्ये वाढ झाली. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 5.59 अंशांनी घसरून 25क्99.92 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 2.65 अंशांनी घसरून 75क्8.8क् अंशांवर बंद झाला. सलग तिस:या आठवडय़ात निर्देशांक खाली आला आहे. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मात्र गतसप्ताहातही वाढ झाली. त्यांच्यामध्ये सुमारे अडीच टक्के वाढ झाली.
इराकमधील बंडखोरांचे संकट आणखी किचकट होत असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरावर होत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने देशांतर्गत गॅसच्या दरात करावयाची वाढ तीन महिने पुढे ढकलली आहे. त्यामुळे तेल आस्थापनांना आणखी तीन महिने नुकसान सोसावे लागेल. 
याचा परिणाम म्हणून तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रतील आस्थापनांचे समभाग खाली आले. रुपयाच्या दरात थोडीशी घसरण झाली. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील आस्थापनांच्या समभागांमध्ये काहीशी तेजी दिसून आली. 
अमेरिका आणि चीन या जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमागील मंदीचा फेरा काही कमी होताना दिसत नाही. मागील सप्ताहात अमेरिकेतील ग्राहकांच्या खरेदीत मे महिन्यात वाढ झाल्याचे जाहीर झाले असले तरी ही वाढ अत्यल्प असल्याने बाजारावर त्याचा विपरित परिणाम 
जाणवला. 
मे महिन्यात चीनचा औद्योगिक नफा वाढला असला तरी तो मागील वर्षापेक्षा कमी असल्याने बाजाराने नकारात्मक संकेत दिले. परिणामी आशियातील शेअर बाजार खाली आले.
आगामी अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्र घेतला आहे. त्यामुळे जून महिन्यांच्या डेरिव्हेटीव्हजच्या सौदापूर्तीत फारशी जान नव्हती. शुक्रवारी परकीय वित्तसंस्थांनी बाजारात मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली असली तरी देशी वित्तसंस्थांनी मात्र विक्री केल्याने बाजारावर कोणताच परिणाम दिसला नाही.
 
4पाचपैकी तीन दिवस बाजारामध्ये झाली घसरण.
4मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये मात्र झाली वाढ.
4शुक्रवारी परकीय वित्तसंस्थांनी केली मोठी खरेदी. 
4 डेरिव्हेटीव्हच्या जून महिन्याच्या सौदापूर्तीमध्ये गुंतवणूकदारांचा सावध पवित्र.
4अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थांबाबत चिंता.
4इराकचे संकट आणखी गंभीर झाल्याने सावधपणा.

Web Title: Hittic fall in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.