Lokmat Money > बिझनेस न्यूज > १४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट

१४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट

big discount on flight booking : होळी सणानिमित्त अनेक विमान कंपन्या तिकीट दरावर भरघोस सवलत देत आहेत. यामध्ये १४९९ रुपयांपासून तिकीट दर सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:19 IST2025-03-11T17:19:02+5:302025-03-11T17:19:02+5:30

big discount on flight booking : होळी सणानिमित्त अनेक विमान कंपन्या तिकीट दरावर भरघोस सवलत देत आहेत. यामध्ये १४९९ रुपयांपासून तिकीट दर सुरू होत आहे.

holi fare war akasa indigo offer big discounts to make you splurge on travel | १४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट

१४९९ रुपयांत हवाई प्रवास! होळीनिमित्त 'या' विमान कंपन्यांची तिकीटांवर भरघोस सूट

Holi Sale : रंगाची उधळण करणारा होळी सण जवळ आला आहे. सणासुदीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या बंपर ऑफर्स घेऊन येतात. विमान कंपन्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर होळी सेल सुरू केला आहे. Akasa Air, IndiGo, Star Air यांनी मर्यादित कालावधीसाठी भाडे कमी केले आहे, ज्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांना हवाई प्रवास अधिक परवडणारा बनला आहे.

Akasa Air ने आपल्या प्लटफॉर्मवर तिकीटांवर सवलत जाहीर केली आहे. सर्व देशांतर्गत तिकिटे १,४९९ रुपयांपासून सुरू आहेत. एवढेच नाही तर, प्रोमो कोड HOLI15 वापरून ग्राहक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्हीसाठी सेव्हर आणि फ्लेक्सी बेस भाड्यावर १५% पर्यंत सूट देखील मिळवू शकतात. विमान कंपनी सर्व उड्डाणांवर १५ टक्के सूट देत आहे.

७ दिवस अगोदर बुकिंग करावे लागणार
ही सवलत १७ मार्च २०२५ पासून सुरू होणाऱ्या प्रवासासाठी १० मार्च ते १३ मार्च २०२५ दरम्यान केलेल्या बुकिंगसाठी लागू आहे. यामध्ये अकासा एअरच्या नेटवर्कवरील नॉन-स्टॉप आणि कनेक्टिंग फ्लाइटचा समावेश आहे, ज्यासाठी किमान ७ दिवस अगोदर बुकिंग करणे आवश्यक आहे.

होळी गेटवे सेल
१० मार्च रोजी इंडिगोने आपली होळी ऑफर सुरू केली आहे. “होली गेटवे सेल” असं या ऑफर्सचे नाव आहे. इंडिगो एअरलाइन देशांतर्गत उड्डाणांसाठी १,१९९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी ४,१९९ रुपयांपासून भाडे ऑफर करत आहे. १० मार्च ते १२ मार्च दरम्यान चालणारी ही जाहिरात १७ मार्च ते २१ सप्टेंबर २०२५ दरम्यानच्या प्रवासासाठी वैध आहे. या कालावधीत फ्लाइट बुक करणाऱ्या ग्राहकांना प्रवास अधिक परवडणारा बनवण्यासाठी एअरलाइन सवलतीच्या ॲड-ऑनची ऑफर देत आहे.

देशांतर्गत स्टार एअरने त्यांच्या ‘होली है’ प्रमोशनचा एक भाग म्हणून सणासुदीसाठी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. एअरलाइन इकॉनॉमी क्लाससाठी ९९९ रुपयांपासून भाडे आकारत आहेत. तर बिझनेस क्लासचे ३,०९९ रुपयांपासून सुरू आहे. या ऑफर अंतर्गत, ११ मार्च ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यानच्या प्रवासासाठी ११ मार्च ते १७ मार्च २०२५ पर्यंत बुकिंग करता येईल.

Web Title: holi fare war akasa indigo offer big discounts to make you splurge on travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.