मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनपेक्षितपणे कपात केल्यामुळे गृहकर्ज, तसेच वाहन कर्ज स्वस्त होईल. रिझर्व्ह बँकेने देशवासीयांना दिलेली ही दसरा-दिवाळी भेटच ठरणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीने (एमपीसी) आपल्या पहिल्या-वहिल्या बैठकीत मंगळवारी रेपो दरात पाव टक्का कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.५0 टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला. नोव्हेंबर २0१0मध्ये रेपो दर एवढाच होता. आॅक्टोबर २0११मध्ये तो सर्वाधिक ८.५ टक्के होता.
रेपो दरातील कपात ग्राहकांपर्यंत पोहोचवा, अशी तंबीच ऊर्जित पटेल यांनी व्यावसायिक बँकांना या वेळी दिली. या पार्श्वभूमीवर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता बळावली आहे. पतधोरण जाहीर होताच सरकारकडून त्याचे स्वागत करण्यात आले. दर कपातीमुळे अर्थव्यवस्थेत अधिक भांडवल उपलब्ध होईल, त्यामुळे वृद्धी दर ८ टक्क्यांवर नेण्यास मदत होईल, असे सरकारने म्हटले. केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या सर्व घटकांवर दर कपातीचा चांगला परिणाम होईल. गृह, वाहन आदी कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय बँकांवर अवलंबून राहील. बाजारातील धारणा लक्षात घेऊन बँका निर्णय घेतील.
एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, बँकांनी कर्जाचे, तसेच ठेवींचे व्याजदर आधीच कमी केले आहेत. कर्जाचे दर प्रत्येक महिन्याला कमी होत आहेत. कपात ग्राहकांपर्यंत जात असल्याचे रिझर्व्ह बँकेनेही मान्य केले आहे.
अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था!
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो
दरात कपात करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जितावस्था मिळण्याची आशा आहे. - वृत्त/१०
भारताचा वृद्धी दर मजबूत राहणार
दक्षिण आशिया हे जागतिक पातळीवरील आर्थिक वृद्धीचे केंद्र असून, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर २0१६मध्ये ७.६ टक्के राहील, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनपेक्षितपणे कपात केल्यामुळे गृहकर्ज, तसेच वाहन कर्ज स्वस्त होईल. रिझर्व्ह बँकेने देशवासीयांना दिलेली ही दसरा-दिवाळी भेटच ठरणार आहे.
By admin | Published: October 5, 2016 05:54 AM2016-10-05T05:54:24+5:302016-10-05T12:13:04+5:30