Join us

घराच्या ‘स्वप्न’पूर्तीला लागले महागाईचे विघ्न!

By admin | Published: February 04, 2015 1:41 AM

बांधकामातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या सिमेंटसह इतर साहित्याचे भाव वाढत असल्याने या व्यवसायावर मंदीचे सावट आहे.

विजयकुमार सैतवाल - जळगावबांधकामातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या सिमेंटसह इतर साहित्याचे भाव वाढत असल्याने या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. इतकेच नव्हे तर वाढत्या किमतीमुळे सामान्यांचे घराचे ‘स्वप्न’ स्वप्नच राहणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, सध्या या स्वप्नाला महागाईचे विघ्न लागल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या जागेच्या किमती हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये ज्यांच्याकडे स्वत:ची जागा उपलब्ध आहे, त्यांनाही बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती विचारात टाकणाऱ्या ठरत आहेत. सिमेंटच्या भावात २० टक्क्यांनी वाढगेल्या अनेक वर्षांपासून सिमेंटचे भाव वाढतच आहेत. यात आता पुन्हा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमेंटची जी गोणी २५० ते २६० रुपयांना मिळत होती, तिची किंमत आता ३१५ ते ३२५ रुपये प्रति गोणी झाली आहे. म्हणजेच एका गोणीमागे सरासरी ७५ रुपये वाढ झाली. ज्यांना बांधकामासाठी हजार गोणी सिमेंट लागणार आहे, त्यांच्या बांधकाम खर्चात सिमेंटचेच ७५,००० रुपये वाढल्याने सर्व बजेट विस्कटून जात आहे. वाळूच्या झळा...बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या वाळूच्या भावासह वाळू हा विषयच दिवसेंदिवस तापत असून त्याच्या झळा सामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांनाही बसत आहेत. वाळू गटांचा लिलाव न होणे अथवा त्यास विलंब होणे ही बाबही त्यास कारणीभूत ठरत आहे. वाळू गटांचा लिलाव न झाल्यास वाळू वाहतूक बंद राहते, हा आता गैरसमज ठरत आहे. कारण लिलाव झाला नसला तरी चोरट्या मार्गाने (?) वाळू वाहतूक सुरूच राहते व तिचे भाव चढे असल्याने सामान्यांच्या आवाक्यात ती नसते. बांधकाम व्यावसायिकांनी ती जास्त भावाने घेतली तर साहजिकच घरांच्या किमतीही आपसूकच वाढतात. वाळूच्या झळा ग्राहकालाच सोसाव्या लागतात. एक ट्रक वाळूची किंमत तीन हजार होती. आता याच किमतीत केवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली वाळू मिळणे कठीण झाले आहे. यावरून भाववाढीची तीव्रता ओळखता येते.च्स्वत:चे घर असावे असे प्रत्येकालाच वाटते, मात्र आता घर घेणे सामान्यांचे काम राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. जे घर पाच ते सात लाख रुपयांना मिळत होते, त्याची किंमत आता २५ लाखांवर गेली आहे. च्सध्या जळगावात टू रूम किचनची किंमत २५ लाखांच्या जवळ आहे. १९९२-९३ मध्ये हेच घर ९० हजारात मिळत होते. च् नोकरदार माणूस तर महागाईमुळे नोकरी करताना घर घेऊ शकत नाही, तो निवृत्तीनंतर तरी स्वमालकीचे घर घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता त्यालाही या वाढत्या किमतीमुळे अडथळा येत आहे. त्यामुळे हे ‘स्वप्न’ पूर्ण कधी होणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.च् जागेच्या वाढलेल्या किमतींमुळे घरे महागली आहेत. तीन-चार वर्षात या व्यवसायात तेजी होती. तेव्हा जास्त किमतीत घेतलेली जागा आता बांधकाम करून कमी किमतीत विकणे बिल्डरांना परवडत नाही व मंदीमुळे खरेदी करण्यास कोणी धजावत नाही.