जानेवारी ते मार्चदरम्यान देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री ७१ टक्क्यांनी वाढून ९९,५५० वर पोहोचली, जी २०१५ नंतरच्या कोणत्याही तिमाहीत झालेल्या विक्रीपेक्षा सर्वाधिक आहे.
कुठे झाली अधिक विक्री?
दिल्ली-एनसीआर । मुंबई एमएमआर क्षेत्र । बेंगळुरू । पुणे । हैदराबाद ।
कोलकाता । चेन्नई
तज्ज्ञ काय म्हणतात...?
वर्ष २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत घरांची विक्री जोरदार झाली आहे. विक्रीतील वाढ ही तिमाही आधारावर सुमारे १० टक्के आणि वार्षिक आधारावर ७१ टक्के राहिली आहे. ही विक्री २०१५ नंतर कोणत्याही तिमाहीतील विक्रीपेक्षा सर्वाधिक आहे.
घरांची विक्री
शहर जाने. ते मार्च-२२ गेल्या वर्षी
विक्री झालेली विक्री
मुंबई २९,१३० २०,३५० (४३% वाढ)
हैदराबाद १३,१३० ४,४४०
दिल्ली १८,८३५ ८,७९०
कोलकाता ५,९९० २,६८०
शहर वाढ (टक्क्यांमध्ये)
बेंगळुरू - १३,४५० ५५%
पुणे - १४,०२० ३३%
चेन्नई - ४,९८५ ७५%
घरांची किमतही वाढली
प्रमुख सात शहरांमधील निवासी मालमत्तांच्या सरासरी किमतीत दोन ते पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवीन घरे वाढली
८९,१५० सध्या निर्माण झालेली घरे
६२,१३० गेल्या वर्षात तयार झालेली घरे
का घेताहेत लोक घर?
गृहकर्जावरील कमी व्याजदर
स्वत:चे घर घेण्याकडे वाढलेला कल
येत्या काही दिवसांत घरांच्या किमती वाढणार असल्याने