Join us

Home: कर्ज महाग, किंमतही वाढली; तरीही खरेदी दणक्यात, घरांमागची ‘घरघर’ गेली, विक्रमी विक्री झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 8:51 AM

Homes: गेल्या वर्षभरात गृहकर्जावरील व्याज दरवाढ तसेच घरांच्याही किमती ६ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घर खरेदीने विक्रम केला आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात गृहकर्जावरील व्याज दरवाढ तसेच घरांच्याही किमती ६ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घर खरेदीने विक्रम केला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत देशातील ७ प्रमुख शहरांमध्ये १ लाख १५ हजार घरांची विक्री झाली आहे. यामध्ये तब्बल ३६ टक्के वाढ झाली आहे. 

अशी झाली घरांची विक्री

...म्हणून घरांच्या किमती वाढल्याकच्च्या मालाची दरवाढ आणि मागणी माेठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घरांच्या किमतीत वाढ झाली. १०%   सर्वाधिक किमती हैदराबाद येथे वाढल्या आहेत.

‘ॲनाराॅक’ संस्थेचा अहवालगृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित ‘ॲनाराॅक’ या संस्थेने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे. सर्वाधिक घर खरेदी मुंबईत झाली आहे, तर एकूण प्रमाण पुण्यात सर्वाधिक वाढले आहे.

मागणी वाढल्यामुळे न विकलेल्या घरांचे प्रमाणही घटले आहे. प्रमुख ७ शहरांमध्ये यात २%  घट झाली आहे. 

घरांची विक्री पुणे व मुंबई या २ शहरांमध्ये झाली आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसायपैसा