नवी दिल्ली : गृहकर्ज (Home Loan)हा अनेकदा लेंडर आणि कर्जदार दोघांसाठी एक जोखिम असलेला व्यवहार असल्याचे सिद्ध होते. गृहकर्जासाठी अर्जदाराला याबाबत शंका असते की, तो अर्ज करत असलेली कर्जाची रक्कम त्याचे घर खरेदी करण्यासाठी पुरेशी असेल की नाही? त्याचबरोबर कर्ज घेणारी व्यक्ती कर्जाची परतफेड करू शकेल की नाही? अशी भीतीही लेंडरला असते.
गृहकर्ज हे अलीकडेच तेजीत असलेले सेक्टर आहे. जूनमध्ये गृहकर्जाची थकबाकी 17.4 ट्रिलियन रुपये होती. याव्यतिरिक्त, नुकतेच गृहकर्जाची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्था तुमचे गृहकर्ज सावधगिरीने मंजूर करतात. गृहकर्ज देण्यापूर्वी लेंडरकडून लीगल आणि टेक्निकल व्हेरिफिकेशन केले जाते.
लीगल व्हेरिफिकेशन
लीगल व्हेरिफिकेशन (Legal Verification) प्रोसेसद्वारे गृहकर्जासाठी देण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध आहेत आणि कर्जदाराच्या बाजूने असे कोणतेही कायदेशीर अडथळे नाहीत, याची पुष्टी केली जाते. लीगल व्हेरिफिकेशन प्रोसेस क्लिष्ट आहे, परंतु गृहकर्ज जारी करण्यापूर्वी ही सर्वात महत्वाची प्रोसेस आहे.
लीगल व्हेरिफिकेशनची प्रोसेस
>> गृहकर्जासाठी अर्ज करताना कर्जदाराने कागदपत्रे लेंडरकडे जमा केली की, लीगल व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू होते.
>> अॅग्रीमेंटची ओरिजनल कॉपी, मालमत्ता कर भरल्याची पावती आणि घराची ब्ल्यू प्रिंट किंवा फ्लोअर प्लॅन यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
>> ऑन-साइट टेक्निकल व्हेरिफिकेशन करताना संबंधितसर्व कागदपत्रांसह ओरिजनल कॉपी उपलब्ध करून द्याव्या लागतील.
>> त्यानंतर लेंडरकडून एक लीगल तपासणी केली जाते. यामध्ये वकिलांसारख्या तज्ज्ञांची टीम कागदपत्रे तपासते, ज्यात एनओसी, टायटल डीड इत्यादींचा समावेश आहे.
>> लीगल व्हेरिफिकेशन प्रोसेस 2 टप्प्यात पूर्ण होते. या प्रोसेसच्या पहिल्या टप्प्यात मालमत्तेचे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायटल रिपोर्ट तयार केला जातो.
लीगल व्हेरिफिकेशननंतर टेक्निकल व्हेरिफिकेशन
लीगल व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसनंतर टेक्निकल व्हेरिफिकेशन (Technical Verification)केले जाते. यामध्ये गृहकर्ज देण्यापूर्वी मालमत्तेची भौतिक स्थिती (फिजिकल कंडीशन) तपासली जाते. तज्ज्ञांची एक टीम मालमत्तेच्या स्थानाला भेट देते आणि मूल्यांकन करते.