Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस

गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस

मार्च २०२४ मध्ये देशातील गृहकर्जाची एकूण थकबाकी २७,२२,७२० कोटी रुपये इतकी होती. त्याआधी मार्च २०२३ मध्ये ती १९,८८,५३२ कोटी रुपये होती. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:00 AM2024-05-07T06:00:24+5:302024-05-07T06:00:40+5:30

मार्च २०२४ मध्ये देशातील गृहकर्जाची एकूण थकबाकी २७,२२,७२० कोटी रुपये इतकी होती. त्याआधी मार्च २०२३ मध्ये ती १९,८८,५३२ कोटी रुपये होती. 

Home loan outstanding rises by Rs 10 lakh crore; Disclosures from the Reserve Bank of India report | गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस

गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस

नवी दिल्ली : मागील २ वर्षांत गृहकर्जाची थकबाकी १० लाख कोटी रुपयांनी वाढून यंदाच्या मार्चमध्ये विक्रमी २७.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या ‘बँक कर्जाचे क्षेत्रनिहाय वितरण’ नावाच्या अहवालात म्हटले की, ‘कोविड साथीनंतर निवासी संपत्ती बाजारात सुप्त मागणी समोर आली. त्यामुळे गृहकर्जाची थकबाकीही वाढली आहे.’
मार्च २०२४ मध्ये देशातील गृहकर्जाची एकूण थकबाकी २७,२२,७२० कोटी रुपये इतकी होती. त्याआधी मार्च २०२३ मध्ये ती १९,८८,५३२ कोटी रुपये होती. 

विक्री व किमतीत वाढ
विभिन्न संपत्ती सल्लागारांच्या अहवालानुसार, मागील २ वर्षांत घरांच्या विक्रीत आणि किमतींत उल्लेखनीय वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की, गृहकर्जातील वृद्धी मजबूत राहील, असा अंदाज आहे. 

Web Title: Home loan outstanding rises by Rs 10 lakh crore; Disclosures from the Reserve Bank of India report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.