चलनातील पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसणार आहे. या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात काळा पैसा होता, त्याला चाप लागणार आहे. त्यामुळे जमीन-जुमला, घरे-प्लॉट यांच्या किमती कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रिअल इस्टेटच्या प्राथमिक बाजारात या निर्णयाचा फार परिणाम होणार नाही. म्हणजेच जे लोक थेट विकासकाकडून घरे विकत घेत आहेत, त्यांच्या व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही. तथापि, दुसऱ्या (सेकंडरी) बाजारात त्याचा परिणाम दिसून येईल.
आगामी काही वर्षांत हा बाजार मंदीत राहील. दुसऱ्या बाजारात कायदेशीर आणि काळ््या पैशांच्या व्यवहाराचे प्रमाण अनुक्रमे
60% - 40% असे आहे. याला आता धक्का लागणार आहे.
जेएलएल इंडियाचे प्रमुख अनुज पुरी यांनी सांगितले की, हजार-पाचशेच्या नोटा रद्द करण्याचा फार व्यापक, तसेच तत्काळ परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर होणार आहे. त्यामुळे हे क्षेत्र मुळापासून हलणार आहे. कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनचे (क्रेडाई) अध्यक्ष गेतांबर आनंद यांनी सांगितले की, बाजारातील बहुतांश घरे कर्जावर विकली जातात. घराच्या किमतीही जाहीर असतात. त्यामुळे या व्यवहारांत काळा-पांढरा असा प्रकार नसतो. त्यामुळे नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. या क्षेत्रातील काही जाणकार सूत्रांनी मात्र, यापेक्षा वेगळी माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक बाजारातही काळा पैसा चालतो. विशेषत: स्थानिक अधिकारी, तसेच राजकीय नेते इत्यादींना केले विकासकांकडून रोखीने रकमा दिल्या जातात. हा पैसा काळाच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल आपल्या भाषणात रिअल इस्टेट आणि जमीन खरेदीत काळ््या पैशाचा वापर होत असल्याचे नमूद केले होते.
>> ब्लॉकमनी
आरबीआयच्या माहितीनुसार सध्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 17,54,000 कोटी रुपयांच्या नोटा वापरात आहेत. त्यापैकी ५०० च्या नोटा ४५ टक्के होत्या, तर १ हजारच्या ३९ टक्के नोटा चलनात होत्या.
१० आणि १०० रुपयांच्या 53%
नोटा चलनात आहेत. मध्यरात्रीपासून १ हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे ६ लाख ३२ हजार ६०० कोटी रुपये बेकायदा ठरणार आहेत. आरबीआयच्या डाटानुसार 2015-16 मध्ये ६.५ लाख नोटा बनावट आढळल्या होत्या. त्यातील ४ लाख नोटा ५०० आणि १ हजारच्या होत्या. १०० रुपयाच्याही सुमारे २ लाख बनावट नोटा चलनात आहेत.
महागाई वाढणार
भरपूर लोकांकडे कायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा आहे. हा पैसा ते बँकेत डिपॉझिट करतील. बँकांकडे जास्त पैसा जमा झाल्यामुळे कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध होईल. हे कर्ज कमी व्याज दरावर उपलब्ध असेल. त्यामुळे महागाई वाढेल. हे सर्व एका रात्रीत होणार नाही. हळूहळू होईल.
असा होता काळा पैसा पांढरा
सूत्रांनी सांगितले की, मेट्रो शहरांतील मोठ्या प्रमाणात विकसित भागात मालमत्तांची फेरविक्री होते, तेव्हा मात्र कॅपिटल गेन टॅक्स चुकविण्यासाठी विकणारा रोखीमध्ये पैसे मागतो. कमी किमतीची रजिस्ट्री झाल्यास खरेदीदाराला कमी मुद्रांक शुल्क लागते. खरेदीदारांकडील काळा पैसाही त्यात पांढरा होतो.
रिअल इस्टेटमध्ये मंदीच
हजार-पाचशेच्या नोटा रद्द झाल्यामुळे बाजारात घबराट निर्माण झाली आहे. येणाऱ्या काही
महिन्यांत रोखीचे व्यवहार होणारच नाहीत. त्यामुळे या काळात रिअल इस्टेट क्षेत्रात पूर्णपणे मंदीचा अंमल राहील.