Lokmat Money > बिझनेस न्यूज > Home: सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार

Home: सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार

Home: गेल्या वर्षभरापासून गृहकर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, असे ९५ टक्क्यांहून अधिक गृहखरेदीदारांनी म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:37 AM2023-04-22T06:37:47+5:302023-04-22T06:38:55+5:30

Home: गेल्या वर्षभरापासून गृहकर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, असे ९५ टक्क्यांहून अधिक गृहखरेदीदारांनी म्हटले आहे.

Home: Should you buy a house right now? 95% of customers changed their purchase decision due to increase in loan installment | Home: सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार

Home: सध्याच घर घ्यावे की नाही? कर्जाचा हप्ता वाढल्याने ९५% ग्राहकांनी बदलला खरेदीचा विचार

मुंबई/नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून गृहकर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला, असे ९५ टक्क्यांहून अधिक गृहखरेदीदारांनी म्हटले आहे. उद्योग संघटना भारतीय उद्योग महासंघ (आयआय) आणि मालमत्ता सल्लागार ॲनारॉक यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

सीआयआयने घर विक्री बाजारात तेजी नावाचा अहवाल सादर केला. या सर्वेक्षणात एकूण ४ हजार ६६२ लोकांनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९६ टक्के घरखरेदीदारांनी म्हटले की, गृहकर्जाचे व्याजदर आणखी वाढल्याने घर खरेदी करण्याच्या निर्णयावर परिणाम होत आहे. भविष्यात घर घेताना याबाबत विचार करावा लागेल, असे खरेदीदार म्हणत आहे. ५८ टक्के गृहखरेदीदारांना ४५ लाख ते १.५ कोटी रुपयांच्या किमतीचे घर हवे आहे.

कुणाला कोणते घर हवे?
- १ बीएचके१२%
- २ बीएचके ४०%
- ३ बीएचके ६%
अधिक मोठे असलेले घर शोधत आहेत.
- ३ बीएचके ४२%
- घरभाड्यात ४% पेक्षा अधिक वाढ

किती वाढले भाडे?    
गुरुग्राम        ८.२%
नोएडा          ५.१%
हैदराबाद      ४.९%
मुंबई           ४.२%
ठाणे           १.५%

n ५८ टक्के गृह खरेदीदारांना ४५ लाख ते १.५ कोटी रुपयांच्या किमतीचे घर हवे आहे. 
n ३६ टक्के जणांनी घरे एका वर्षात तयार होण्यास प्राधान्य दिले आहे.

बिल्डर-खरेदीदार समिती
गृहखरेदी प्रक्रियेत सुधारणा व्हावी म्हणून खरेदीदार करार मॉडेलवर काम करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे सदस्य न्यायाधीश, राष्ट्रीय आणि राज्य ग्राहक आयोग, विविध ग्राहक संस्था, वकील तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयातील लोक असतील. येत्या तीन महिन्यांत ही समिती स्थापन होईल.
बिल्डरांनी खरेदी केली 
६,८०० एकर जमीन
रिअल इस्टेट डेव्हलपरनी २०१८ ते २०२२ दरम्यान प्रकल्प उभारण्यासाठी १२.२ अब्ज डॉलर खर्च करून तब्बल ६,८०० एकर जमीन संपादित केली. प्रॉपर्टी कन्सल्टन्सी कंपनी सीबीआरई इंडियाने ही माहिती दिली. मुंबईमध्ये ९६० एअर जमिनीचे ७३ सौदे ३.८ अब्ज डॉलर रुपयांमध्ये झाले आहेत.

Web Title: Home: Should you buy a house right now? 95% of customers changed their purchase decision due to increase in loan installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.