Join us

कर्ज काढून हनिमून! जोडप्यांची संख्या वाढली; ट्रॅव्हल कंपन्यांची योजना यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 7:18 AM

‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ असे चार्वाकचे प्रसिद्ध वचन आहे. कर्ज काढा आणि खुशाल तूप प्या, असा त्याचा अर्थ.

नवी दिल्ली :

‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ असे चार्वाकचे प्रसिद्ध वचन आहे. कर्ज काढा आणि खुशाल तूप प्या, असा त्याचा अर्थ. तूप पिण्यासाठी कोणी कर्ज काढत नाही, मात्र हनिमूनसाठी लोक आता खुशाल कर्ज काढताना दिसत आहेत. कर्जाऊ हनिमूनवाल्यांची संख्या यंदा थोडीथोडकी नव्हे, तर चांगली ४० टक्क्यांनी वाढली आहे.

अनेक ट्रॅव्हल कंपन्या नवविवाहितांना हनिमूनसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे हे प्रमाण वाढत चालले आहे. वास्तविक, अलीकडे कर्ज काढून विदेशात फिरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना साथीच्या काळात टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. कोरोना साथ संपल्यानंतरही प्रवास करण्यासाठी लोकांकडे फारसा पैसा नव्हता. त्यातून मार्ग काढण्यासाठी कंपन्यांनी ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर’ म्हणजेच ‘आता प्रवास करा, पैसे नंतर द्या’ अशी योजना आणली. त्यामुळे लोक प्रवासाकडे वळले. काही बँका प्रवासासाठी कर्ज देत असल्यामुळे त्याचा लाभ प्रवासी घेऊ लागले. ट्रॅव्हल एजन्सींच्या म्हणण्यानुसार, कर्ज घेऊन विदेशात फिरायला जाणाऱ्यांची संख्या यंदा २५ ते ४० टक्क्यांनी वाढत आहे.

हे लोक घेत आहेत योजनेचा अधिक लाभ- अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी बँकांसोबत करार करून ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर’ योजना ग्राहकांच्या सेवेत रुजू केल्या आहेत. प्रवाशांना कर्जासाठी बँकांच्या दारात जाण्याची गरजही त्यामुळे राहिली नाही. - ट्रॅव्हल कंपन्या प्रवाशांना कर्ज मंजूर करून देतात. त्यामुळे ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात जबरदस्त वृद्धी दिसून येत आहे. आयटी व्यावसायिक व हनिमून कपल्स या योजनेचा सर्वाधिक लाभ घेताना दिसून येत आहेत.

इतकी वाढली संख्याएका प्रसिद्ध भारतीय ट्रॅव्हल कंपनीसोबत कर्ज घेऊन विदेश प्रवास करणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. लोक ३ ते १३ महिन्यांच्या परतफेड योजनांना प्राधान्य देतात. चेन्नईची ट्रॅव्हल कंपनी मदुराई ट्रॅव्हल सर्व्हिसेसने म्हटले की, जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत कर्ज घेऊन विदेशात हनिमूनला जाणाऱ्या कपल्सची संख्या ३० ते ४० टक्के वाढली आहे.

४०% वाढ०१% हिस्सेदारी ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ योजनेची एकूण व्यवसायात०५% हिस्सेदारी होणार पुढील वर्षी ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ची१.५ लाख रुपयांचे सरासरी कर्ज विदेश प्रवासासाठी घेत आहेत लोक१० लाख कोटी रुपयांचा होणार देशाचा पर्यटन व्यवसाय आगामी ४ वर्षांत

टॅग्स :व्यवसाय