Lokmat Money > बिझनेस न्यूज > हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:06 AM2019-08-16T03:06:08+5:302019-08-16T03:06:33+5:30

हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

Hong Kong's economic situation should improve - Trump | हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँगमधील आर्थिक स्थिती सुधारायला हवी - ट्रम्प

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांच्या आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढायला हवा़ कारण याचा परिणाम थेट बीजिंगमधील आर्थिक घसरणीवर होत आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. 

बुधवारी ट्रम्प यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये याविषयीच्या सर्व शक्यतांवर भाष्य केले़ बीजिंगमधील राजकीय अस्वस्थतेवर शांततेच्या मार्गाने तोडगा निघू शकतो़ चीनमधील बेरोजगारी वाढली आहे़ तेथील नोकऱ्या कमी झाल्या आहेत़ अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत़ बीजिंगमधील आंदोलनाचा फटका उद्योगांना बसत आहे़ ही परिस्थिती बदलण्यासाठी चीनने आधी हाँगकाँगकडे लक्ष केंद्रित करायल हवे, असे ट्रम्प यांनी टिष्ट्वटमध्ये नमूद केले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष झी पिंग हे या परिस्थितीवर नम्रपणे व तातडीने तोडगा काढू शकतील, याची मला पूर्ण खात्री आहे, असे मत व्यक्त करत ट्रम्प यांनी झि पिंग यांच्याशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला.  हाँगकाँगमधील आंदोलनाला तेथील विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला कधी कधी हिंसक वळणही लागते़ १९९७ साली ब्रिटिशांनी हाँगकाँगमधून माघार घेतली़ येथील स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची अट ब्रिटिशांनी घातली.  त्यामुळे येथील सरकारसमोर या अटीचे मोठे आव्हान आहे.  कारण येथील मूळ निवासी हद्दपार होत असल्याचा आरोप होत आहे. आंदोलनाच्या काळात विमानतळावर हिंसक घटना घडली होती.  कितीही हिंसक घटना घडल्या तरी आंदोलनाला मोठा जनाधार आहे, हे दाखवून देण्यासाठी आंदोलकांकडून मोठ्या रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hong Kong's economic situation should improve - Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.