Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘आयटी काॅरिडाॅर’मध्ये वसतिगृहे ‘लाॅगआऊट’च, बेराेजगारीचे मोठे संकट

‘आयटी काॅरिडाॅर’मध्ये वसतिगृहे ‘लाॅगआऊट’च, बेराेजगारीचे मोठे संकट

Coronavirus : हैदराबादमध्ये आयटी काॅरिडाॅर म्हणून ओळखला जाताे. हाेस्टेल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३५०० वसतिगृहे या भागात आहेत. त्यातून ६० हजार कुटुंबांना अप्रत्यक्षपणे राेजगार मिळताे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 05:44 AM2020-12-07T05:44:08+5:302020-12-07T05:53:39+5:30

Coronavirus : हैदराबादमध्ये आयटी काॅरिडाॅर म्हणून ओळखला जाताे. हाेस्टेल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३५०० वसतिगृहे या भागात आहेत. त्यातून ६० हजार कुटुंबांना अप्रत्यक्षपणे राेजगार मिळताे. 

Hostels in the 'IT Corridor' are 'logout' | ‘आयटी काॅरिडाॅर’मध्ये वसतिगृहे ‘लाॅगआऊट’च, बेराेजगारीचे मोठे संकट

‘आयटी काॅरिडाॅर’मध्ये वसतिगृहे ‘लाॅगआऊट’च, बेराेजगारीचे मोठे संकट

हैदराबाद : काेराेना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लाॅकडाऊन लागले. या काळात लाेकांना वर्क फ्राॅम हाेम या संकल्पनेचा फायदा झाला. आयटी क्षेत्रासाठी हे नवे नसले तरीही हैदराबादसारख्या आयटी सिटीमध्ये अजूनही बहुसंख्य कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. याचा वसतिगृह व्यवसायावर परिणाम झाला आहे.
हैदराबादमध्ये आयटी काॅरिडाॅर म्हणून ओळखला जाताे. हाेस्टेल संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३५०० वसतिगृहे या भागात आहेत. त्यातून ६० हजार कुटुंबांना अप्रत्यक्षपणे राेजगार मिळताे.  आयटी क्षेत्रातील जवळपास ४ लाख कर्मचारी वसतिगृहांमध्ये वास्तव्य करतात. अतिशय कमी शुल्कामध्ये साेय या ठिकाणी हाेते. परंतु, वर्क फ्राॅम हाेम संकल्पनेनंतर आता वसतिगृहांमध्ये शुकशुकाट आहे.  

आयटी कंपन्यांकडे डाेळे
अनलाॅकनंतर वसतिगृहांना परवानगी मिळाली. दसऱ्यानंतर सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा या क्षेत्राला हाेती. पण, तसे झाले नाही. त्यामुळे वसतिगृहचालकांचे डाेळे आता आयटी कंपन्यांकडे लागले आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांना परत बाेलावतील ही अपेक्षा आहे.
 

Web Title: Hostels in the 'IT Corridor' are 'logout'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.