आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यास अद्याप सुमारे १०० दिवस शिल्लक आहेत, परंतु त्याचे अहमदाबादमध्ये आतापासूनच त्याची क्रेझ दिसून येत आहे. येथील हॉटेलच्या रुमचं बुकिंग वेगानं सुरू झालंय. विश्वचषकादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लोकांना तीन महिने अगोदर हॉटेल्स बुक करायला सुरुवात केलीये. तर दुसरीकडे याचा फायदा घेत हॉटेल्सचं भाडंही अनेक पटींनी वाढल्याची परिस्थिती निर्माण झालीये.
अनेक हॉटेल्सचं एका दिवसाचं भाडं ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचलंय. अहमदाबादमधील पंचतारांकित हॉटेलमधील बेस क्लास रूम काही ठिकाणी ५० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. इतर वेळी, अशा हॉटेल रुम्सची किंमत ६,५००-१०,५०० रुपयांपर्यंत असतं. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना आणि भारत-पाकिस्तानचा सामना होणारे.
हॉटेल फुल होण्याच्या मार्गावर१५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत मोठी उत्सुकता असल्याचं हॉटेल चालकांनी सांगितलं. १३-१६ ऑक्टोबर या कालावधीसाठी बुकिंग आधीच करण्यात आलं आहे. बहुतांश हॉटेल्स भरलेली आहेत. "आंतरराष्ट्रीय क्रिकेट गट, चाहते आणि प्रायोजकांकडून चौकशी सुरू आहे. अनेक व्हीव्हीआयपीही बुकिंगसाठी सध्या संपर्क करत आहेत," अशी प्रतिक्रिया ITC नर्मदाचे महाव्यवस्थापक कीनन मॅकेन्झी यांनी दिली.
इंग्लंड न्यूझीलंड सामन्यासाठीही बुकिंगबहुतांश पंचतारांकित हॉटेल्समध्ये मॅचच्या दिवसांत ६० ते ९० टक्के रुम्स बूक असल्याचं हयात रिजन्सी अहमदाबादच्या मॅनेजरनं सांगितलं. तर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या पहिल्या सामन्यासाठीही यापूर्वीच बुकिंग झाल्याचं महाव्यवस्थापक पुनित बैजल म्हणाले. उद्योगातील सूत्रांनुसार, बेस श्रेणीतील रुम्स सुमारे ५२ हजार रुपये आणि प्रीमियम श्रेणीतील रुम्स १ लाख आणि त्याहून अधिक किंमतीला घेतल्या जात आहेत.