Lokmat Money > बिझनेस न्यूज > पैशांची घरामध्येच होतेय साठवणूक

पैशांची घरामध्येच होतेय साठवणूक

रोख साठवणुकीची ही मानसिकताच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अडसर ठरत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:19 AM2018-04-28T01:19:37+5:302018-04-28T01:19:37+5:30

रोख साठवणुकीची ही मानसिकताच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अडसर ठरत आहे.

The house of money is in the house | पैशांची घरामध्येच होतेय साठवणूक

पैशांची घरामध्येच होतेय साठवणूक


मुंबई : नोटाटंचाईच्या झळा थोड्या प्रमाणात कमी झाल्या, तरी भारतीयांकडून पैशांची साठवणूक सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या माहितीतून समोर येत आहे. एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांत खातेदारांनी १६ हजार कोटी रुपये बँकेतून काढले. रोख साठवणुकीची ही मानसिकताच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अडसर ठरत आहे.
रोख विथड्रॉल अचानक वाढल्याने, अनेक भागातील एटीएम मागील आठवड्यात ठप्प होऊन देशभरात नोटाटंचाई निर्माण झाली होती. प्रामुख्याने २०००च्या नोटा चलनातून गायब झाल्याचे स्टेट बँकेनेही मान्य केले. रिझर्व्ह बँक मात्र नोटाटंचाई नसल्याचा दावा सातत्याने करीत आहे. तसे असले, तरी बँकेनेच प्रसिद्ध केलेल्या रोखी संदर्भातील अहवालात पैशांची साठवणूक होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
रिझर्व्ह बँकेने २० एप्रिलपर्यंत १८.९० लाख कोटी रुपये चलनात आणले. हा आकडा २०१७-१८च्या पहिल्या अर्ध वर्षापेक्षा १८.९० टक्के अधिक आहे. त्याच वेळी ३१ मार्च ते २० एप्रिल या तीन आठवड्यांत ५९,५२० कोटी रुपये नव्याने चलनात आणले. दर आठवड्यात बँकेकडून रोख बाजारात आणली जात आहे, पण नागरिकांनी एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांतच १६,४७० कोटी रुपये विथड्रॉल केले. जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांत नागरिकांनी एकूण १.४० लाख कोटी रुपये बँकेतून काढले.

आणखी ७0 हजार कोटी हवेत
हे सध्याच्या नोटाटंचाईचे एक कारण असू शकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे, पण परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आणखी किमान ७० हजार कोटी रुपयांच्या नोटांची छपाई करावीच लागेल, असे स्टेट बँकेचे मत आहे.

Web Title: The house of money is in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.