मुंबई : भारतीयांचा सोने खरेदीसाठी पहिल्यापासूनच ओढा राहिलेला आहे. सोन्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्या रकमेचे सोने आपण घेऊ शकतो. अगदी १ हजारापासून ते १ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने आपण खरेदी करू शकतो. तर घर खरेदीसाठी एकाचवेळी अधिक रकमेची आवश्यकता असते. यात खरेदीदाराला अधिक परताव्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम असेल तर तुमचे पैसे कुठे खर्च करायचे हे तुम्ही कसे निवडाल? चांगल्या परताव्यासाठी सोने की घर खरेदी चांगली हे पाहूया...अधिक उत्पन्नघर अथवा बांधकामाची जागा खरेदी केल्यास अतिरिक्त कर सवलत तर मिळतेच याशिवाय नियमित उत्पन्नाचे पर्यायही उपलब्ध होतात. निवासी असो वा व्यावसायिक बांधकामामध्ये गुंतवणूकदारांसाठी मासिक भाड्याने रोख स्वरूपात उत्पन्न निर्माण करण्याची क्षमता असते, जी सोन्याच्या गुंतवणुकीतून करता येत नाही.परताव्याचा दर वाढत्या भाड्यामुळे घरामधून १५ टक्के वार्षिक परतावा मिळू शकतो, असा आजवरचा इतिहास सांगतो. बाजार आणि अर्थव्यवस्थेसह मालमत्तेचे मूल्यही हळूहळू सुधारत असते. तर दुसरीकडे, सोन्याचा वापर महागाईपासून बचाव करण्यासाठी केला जातो, याचा अर्थ सोन्याचा परतावा महागाईशी सुसंगत आहे. जेव्हा अर्थव्यवस्था कोसळत असते तेव्हाच सोन्याला भाव येतो, तोही तात्पुरता असतो.अस्थिरता आणि धोकाघरातील गुंतवणूक हा अत्यंत स्थिर गुंतवणूक पर्याय आहे, जो कमी जोखमींसह येतो. संपत्तीमुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहिल्याने मानसिक समाधान मिळते. दुसरीकडे, सोने ही एक कमोडिटी आहे, ज्यात उच्च अस्थिरता आणि चोरी होण्याची मोठी जोखीम असते.खर्च असला तरी किंमत वाढतेसोन्यापेक्षा मालमत्तेचा देखभाल आणि नूतनीकरणाचा खर्च अधिक येतो असा तर्क असू शकतो. तथापि, ही किंमत केवळ तुमच्या मालमत्तेची किंमत वाढविण्यासह तुम्हाला कर लाभाचे फायदे देखील देते.दीर्घकालीन फायदाघर किंवा बांधकाम जितके जुने तितके त्याचे मूल्य अधिक असते. तुम्ही जमीन निर्माण करू शकत नसल्यामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मागणी वाढत असल्याने घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सोन्यात असा अधिक फायदा मिळत नाही. केवळ अतिशय गरजेच्या वेळीच सोन्याचा कर्ज घेण्यासाठी वापर होतो.अर्थव्यवस्थेला मदतरिअल इस्टेटला मोठ्या निधीची आवश्यकता असू शकते, परंतु बऱ्याच क्षेत्रांचे अस्तित्व यावर अवलंबून असते. सिमेंट, गृहनिर्माण कर्ज, बांधकाम साहित्य आणि इतर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेटवर अवलंबून असतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला मदत होते.कररिअल इस्टेटमधील गुंतवणूक अनेक कर सवलतींसह येते. रिअल इस्टेट गुंतवणूक ही केवळ एक सुरक्षित गुंतवणूक नाही तर त्यातून नियमित उत्पन्नासह काही कालावधीनंतर चांगला परतावाही मिळू शकतो. हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे आणि तुम्ही संपत्ती आणि मालमत्ता तयार करण्यासाठी त्याचा फायदा घेऊ शकता.
घर घेऊ की सोने खरेदी करू? गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय कोणता?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 6:00 AM