Lokmat Money > बिझनेस न्यूज > घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव

घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव

घरांच्या मागणीत वाढ होण्यामागे खरेदीदारांत वाढलेला विश्वास हे प्रमुख कारण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 06:13 AM2024-02-29T06:13:20+5:302024-02-29T06:13:31+5:30

घरांच्या मागणीत वाढ होण्यामागे खरेदीदारांत वाढलेला विश्वास हे प्रमुख कारण आहे.

Houses cost 20 percent, but rush to buy, todays real estate | घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव

घरे २० टक्क्यांनी महागली, तरी खरेदीसाठी धावाधाव

नवी दिल्ली : मागील २ वर्षांत घरांच्या किमती २० टक्के महाग झाल्या आहेत. तरीही घरांच्या मागणीतील तेजी मात्र कायमच असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. क्रेडाई आणि कोलियर्स लियासेज फोराज यांनी संयुक्तरित्या जारी केलेल्या ‘हाउसिंग प्राइस ट्रॅकर’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, २०२१ ते २०२३ या कालावधीत देशातील सर्वोच्च-८ शहरांत घरांच्या किमती २० टक्के वाढल्या. घरांच्या मागणीतील वाढ हे यामागील मुख्य कारण आहे.

घरांच्या मागणीत वाढ होण्यामागे खरेदीदारांत वाढलेला विश्वास हे प्रमुख कारण आहे. याशिवाय किफायतशीर व्याजदर आणि सकारात्मक आर्थिक अंदाज ही अन्य काही कारणे या मागे आहेत.

बंगळुरूत सर्वाधिक वाढ
बंगळुरू, दिल्ली एनसीआर आणि कोलकाता या शहरांत घरे सर्वाधिक महागली. इथे घरांच्या किमती सरासरी ३० टक्के वाढल्या. बंगळुरूत सर्वाधिक ३१ टक्के वाढ झाली. २०२३ चा विचार केल्यास या वर्षात किमती ९ टक्के वाढल्या. 
घरांच्या मागणीत वाढ झाल्याने कल्या न गेलेल्या घरांची संख्या घटली आहे. सर्वाधिक १९ टक्के घट दिल्ली एनसीआरमध्ये झाली आहे.

Web Title: Houses cost 20 percent, but rush to buy, todays real estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.