Join us

फेस्टिव्ह सीजनमध्ये ३६ टक्क्यांपर्यंत वाढणार घरांची मागणी; प्रॉपर्टी खरेदीचा सर्वोत्तम कालावधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 6:06 PM

housing sales : ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही दरम्यान घरांच्या विक्रीत ३३ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकतो.

नवी दिल्ली : फेस्टिव्ह सीजनच्या मागणीनुसार शेवटच्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीमध्ये अनिवासी घरांच्या विक्रीत 36 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या व्याजदर कमी आहे आणि सरकारकडून सुद्धा अनेक प्रकारचे इन्सेटिव्ह देण्यात येत आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे फेस्टिव्ह सीजनच्या काळात घर खरेदी करणारे या सर्व गोष्टींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच, डेव्हलपर्स सुद्धा अनेक फेस्टिव्ह ऑफर्स उपलब्ध करून देत आहेत.

दुसर्‍या तिमाहीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव असला तरीही अनिवासी घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. येणाऱ्या फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेक फायदे पाहून लोक आता घर विकत घेतील, त्यामुळे हाउसिंग सेल्समध्ये वाढ होण्यामागे हे कारण योग्य आहेत, असे ANAROCK प्रॉपर्टी कंसल्टेंट्सचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी सांगितले. 

घर खरेदी करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी डेव्हलपर्स नेहमी प्रयत्न करत असतात. डेव्हलपर्सनी फेस्टिव्ह सीजनच्या आधीच अनेक ऑफर्सचे आयोजन केले आहे. मात्र, या ऑफर्स मर्यादित कालावधी पुरत्या असतात. ज्यावेळी हाऊसिंग मार्केटमध्ये पर्याप्त वाढ होईल, त्यावेळी या ऑफर्स मागे घेतल्या जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत जास्तकरून घर खरेदी करणारे ग्राहक या ऑफर्सचा लाभ घेतील.

ANAROCK च्या माहितीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही दरम्यान घरांच्या विक्रीत ३३ ते ३६ टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकतो. या काळात घर खरेदी करणारे स्टॅम्प ड्युटी चार्जेस, कमी व्याजदर आणि डेव्हलपर्सकडून मिळणाऱ्या ऑफर्सचा सर्वात जास्त फायदा घेण्यासाठी प्रयत्न करतात.

कोणत्या शहरात विक्री वाढणार?हैदराबादमध्ये ही वाढ २० ते २४ टक्क्यापर्यंत आहे. मागील तिमाहीमध्ये केवळ १, ६५० युनिट्सची विक्री दिसून आली होती. बंगळुरुमध्ये जुलै-सप्टेंबर दरम्यान ५,४०० युनिट्सची विक्री झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, अशी शक्यता ANAROCK ने वर्तविली आहे. अशा प्रकारे दिल्ली-एनसीआर क्षेत्रामध्ये २७ ते ३१ टक्के घरांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. पुण्यात ३४ टक्क्यांपर्यंत विक्री वाढू शकते. चेन्नईमध्ये २० ते २६ टक्के आणि कोलकात्यामध्ये ३० टक्के घरांच्या विक्रीची अपेक्षा आहे. 

टॅग्स :घरव्यवसाय