जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आमि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही केवळ चार क्लिकमध्ये प्री-अप्रुव्ह्ड पर्सनल लोन (Personal Loan) घेऊ शकता. स्टेट बँकेच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे. पाहा तुम्हाला कसा करता येईल यासाठी अर्ज.कशी आहे प्रक्रिया?
- सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये YONO अॅप डाऊनलोड करुन लॉग इन करा.
- त्यानंतक Click on Avail Now वर क्लिकर करा.
- लोनची रक्कम आणि त्याचा कालावधी निवडा.
- तुमच्या रजिस्टर मोबाइलवर एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.
- लोन कोणाला मिळू शकेल, हे पडताळून पाहण्यासाठी तुम्हाला "PAPL" असं टाइप करून 567676 वर पाठवावं लागेल.
काय आहे विशेष?
- या लोनचा व्याजदर ९,६० टक्क्यांपासून सुरू होतो.
- Festive Offer: ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रोसेसिंग चार्जवर १०० टक्केसूट देण्यात येणार आहे.
- केवळ चार क्लिकमध्ये लोन प्रोसेसिंगचे पैसे तुमच्या खात्यात येतील.
- यासाठी कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सची गरज भासणार नाही.
- योनोच्या माध्यमातून हे २४ तास उपलब्ध असेल.
- यासाठी कोणत्याही ग्राहकाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
गेल्या महिन्यात SBI नं YONO वर प्री अप्रुव्ह्ड टू व्हिलर लोन 'SBI Easy Ride' लाँच केलं होतं. हेदेखील बँकेच्या शाखेत न जाता अॅपच्या माध्यमातून एन्ट टू एन्ड पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकतं.