नवी दिल्ली : जर तुम्हाला लवकर करोडपती बनायचे असेल (How to be a crorepati? तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. एकीकडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वेगाने वाढत आहे. यादरम्यान, इंडियन ऑइल (Indian Oil) आपल्या ग्राहकांना दोन कोटी रुपये (Earn 2 crore Rupees) जिंकण्याची संधी देत आहे.
इंडियन ऑइल कंपनीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कंपनीकडून एक खास ऑफर आणली आहे, ज्याचे नाव आहे- 'डिझेल भरो, इनाम जीतो' (Diesel Bharo, Inaam jeeto). ही ऑफर जिंकून तुम्ही करोडपती होऊ शकता. दरम्यान, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या ऑफरचा लाभ घेऊ शकते.
काय आहे इंडियन ऑइलची ऑफर?
'डिझेल भरो, इनाम जीतो...' ऑफरचा एक भाग होण्यासाठी आपल्याला इंडियन ऑइलच्या कोणत्याही रिटेल आउटलेट्सवर किमान 25 लीटर किंवा त्याहून अधिक डिझेल खरेदी करणे आवश्यक आहे. अट अशी आहे की, हे डिझेट एकाच बिलामध्ये खरेदी करावे लागेल. म्हणजे आपल्याला एकाचवेळी 25 लिटर डिझेल खरेदी करावे लागेल. यासाठी स्वतंत्र बिले नसावीत.
#Paytm युजर्ससाठी खूशखबर! आता गॅस सिलिंडरसाठीही मिळणार कर्ज
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
https://t.co/MgyMzA7bJh
कसे जिंकू शकता 2 कोटी?
25 लिटर किंवा त्याहून अधिक डिझेल खरेदी केल्यावर तुम्हाला जे सिंगल प्रिटेंड बिल मिळेल. त्यावर एक बिल नंबर आणि डीलर कोड असेल. तो कोड 7799033333 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.
कसे पाठवावा SMS?
एसएमएस पाठविण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डीलर कोड टाईप करावा लागेल, त्यानंतर स्पेस देऊन बिल क्रमांक टाईप करावा लागेल. त्यानंतर पुन्हा स्पेस देऊन क्वांटिटी टाइप करा आणि 7799033333 वर पाठवावा.
#ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून होणार मोठा बदल, आजच जाणून घ्या... https://t.co/spPQmqxC9Q#Banking
— Lokmat (@MiLOKMAT) July 6, 2021
येथे पाहा प्रोसेस
SMS DEALER CODE [SPACE] BILL NUMBER [SPACE] QUANTITY to 77990 33333. दरम्यान, बीएसएनएल / एमटीएनएल / सहावी / एअरटेल / एअरसेल / जियो यासह सर्व युजर्ससाठी SMS सुविधा उपलब्ध आहे.