नवी दिल्ली- श्रीमंत व्हावं हे प्रत्येक सामान्य आणि गरिबाचं स्वप्न असते. परंतु ते पूर्ण करण्याची धमक मोजक्याच लोकांमध्ये असते. जर आपण नोकरी करत असाल तर त्याबरोबरच गुंतवणूक करू शकता. पण त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जर तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि निवृत्तीच्या वयात तुम्हाला 2 कोटी रुपये जमावयाचे असल्यास दर महिन्याला तुम्ही 5 हजार रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. जर या गुंतवणुकीवर तुम्हाला 10 टक्के व्याज मिळाले, तर तुम्ही निवृत्तीच्या वयातच करोडपती होऊ शकता.
- अशी करा गुंतवणूक
वय वर्षं 25 महिन्याची गुंतवणूक 5 हजारगुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्केनिवृत्तीचं वय 60 वर्षंगुंतवणुकीची रक्कम 21 लाखव्याजानंतरची झालेली रक्कम 1.70 कोटी रुपयेएकूण मिळणारी रक्कम 1.91 कोटी रुपये परंतु असा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणूक करावी लागणार आहे. यात गुंतवणुकीची जोखीम कमी होऊन चांगला परतावा मिळू शकतो. कारण एसआयपीच्या माध्यमातूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. तज्ज्ञांच्या मते, अशा गुंतवणुकीवर 10 टक्के व्याज मिळते. जर तुमचं वय 30 वर्षं आहे आणि निवृत्तीच्या वयात 1.5 कोटी रुपये जमा करायचे असल्यास तुम्हाला 8 हजार प्रतिमाह गुंतवणूक करावी लागणार आहे. जर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 10 टक्के व्याज मिळाल्यास निवृत्तीपर्यंत 2 कोटी रुपये जमा होतात.
- अशी करा गुंतवणूक
वय वर्षं 30 महिन्याची गुंतवणूक 8 हजारगुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्केनिवृत्तीचं वय 60 वर्षंगुंतवणुकीची रक्कम 28.80 लाखव्याजानंतरची झालेली रक्कम 1.53 कोटी रुपयेएकूण मिळणारी रक्कम 1.82 कोटी रुपये
- 35व्या वर्षांत करावं लागणार हे काम
वय वर्षं 35प्रतिमहिना गुंतवणूक 14 हजारगुंतवणुकीवरच्या रकमेचा व्याजदर 10 टक्केनिवृत्तीचं वय 60 वर्षंगुंतवणुकीची रक्कम 42 लाखव्याजानंतरची झालेली रक्कम 1.45 कोटी रुपयेएकूण मिळणारी रक्कम 1.87 कोटी रुपये सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. प्रत्येक महिन्याच्या पगारातील काही रक्कम बाजूला केल्यास बजेटवर फार काही फरक पडत नाही. या गुंतवणूक केलेल्या पैशावर तुम्हाला चक्रव्याढ व्याजानं परतावा मिळतो.